Aurangabad Crime | धक्कादायक ! कर्तव्य बजाविण्यास गेलेल्या पोलिस कर्मचार्‍याचा चक्क दोरीनं आवळला गळा (व्हिडीओ)

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाचा दोन तरुणांनी दोरीनं गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad Crime) घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad Crime) लासूर स्टेशन गावात (Lasur station village) घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) प्रचंड व्हायरल (viral) होत आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

दीपक वाघचौरे (Deepak Waghchaure) आणि मारुती वाघचौरे (Maruti Waghchaure) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेच्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad Crime) लासुर स्टेशन गावातील बस स्थानक परिसरात काही तरुणांमध्ये वाद (dispute) सुरु होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी कृष्णा पवार (Police Krishna Pawar) हे आरोपींमधील वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी गेले. ते आरोपींसोबत बोलून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना पाठिमागून आलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यात दोरी टाकून गळा आवळण्याचा प्रयत्न (Aurangabad Crime) केला.

 

 

कृष्णा पवार हे तरुणांमधील वाद मिटवत असताना बेसावध असलेल्या पवार यांच्या गळ्यात दोरी टाकून त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार भररस्त्यावर घडला आहे. ही घटना घडत असताना आसपास काही नागरिक देखील होते. यातील एका नागरिकाने संबंधित घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. आरोपी तरुण पोलीस कर्मचारी पवार यांच्या पाठीमागून दोरी टाकत असताना स्पष्टपणे दिसत आहे.

 

या घटनेचा व्हिडिओ काही वेळात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी दीपक वाघचौरे आणि मारुती वाघचौरे या
दोन आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Aurangabad Crime | accused attack on police in aurangabad who went to settle dispute viral video marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा