Covid Vaccination | व्हॅक्सीन घेण्यावरून एकमेकीवर तुटून पडल्या महिला, झाली जोरदार हाणामारी; ओढले एकमेकींचे केस (Video)

खरगोन : वृत्त संस्था – मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) खरगोन जिल्ह्यात कोविडच्या लसीकरणावरून (Vaccination) लोकांमध्ये जबरदस्त हाणामारी होत आहे. लसीकरणासाठी (Vaccination) लोकांमध्ये मोठा उत्साह असल्याने गर्दी उसळत आहे. हिच गर्दी अनेकदा प्रशासनासाठी अडचणी निर्माण करणारी ठरत आहे. ताजे प्रकरण खरगोनच्या कसरावद तालुक्यातील एका गावातून समोर आले आहे, जिथे व्हॅक्सीनवरून (Vaccination) लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) महिला एकमेकीवर तुटून पडल्या आणि जोरदार हाणामारी झाली.

व्हिडीओ पाहण्यासाठी आवश्य पोलीसनामाच्या फेसबुक पेजला भेट द्या (Watch Video On Policenama Facebook Page. Just Click Here)

खरगोरचे आहे प्रकरण
जिल्हा मुख्यालयापासून (District Headquarters) 40 किलोमीटर अंतरावरील कसरावद तालुक्यातील खलबुजुर्ग गावातील व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) वायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, येथे व्हॅक्सीन घेण्यासाठी महिलांची मोठी रांग लागली आहे. यावेळी अगोदर व्हॅक्सीन घेण्याच्या चढओढीत महिला आपसात भांडू लागतात आणि नंतर हळुहळु भांडणातून हाणामारी सुरू होते. यानंतर महिला एकमेकींचे केस ओढू लागतात. एका महिलेची वेणी तर अशी ओढली गेली की ती दूर जाऊन पडली.

लोकांनी केला सोडवण्याचा प्रयत्न

व्हिडिओत दिसत आहे की, काही पुरुष महिलांची हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत. परंतु त्यांना यश आले नाही. लोकांचे म्हणणे आहे की, आरोग्य विभागाकडून (Health Department) कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती, परिणामी हाणामारी झाली. लोकांची गर्दी जसजशी वाढली तसातसा गोंधळ उडाला. संधीचा फायदा घेत अनेकजण सेंटरमध्ये घुसले. यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांनाही अडचणींचा सामना करावा लागला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page , Follow us instagram 
and Twitter for every update

Web Title : Covid Vaccination |  Women who broke up with each other after receiving the vaccine, had a violent fight; Pulled each other’s hair (Video)

 

Pune News | वंचितांच्या विकासासाठी झटणारा सच्चा कार्यकर्ता विलास चाफेकर यांचे निधन

Agri Produce Exporters | भारताचा जगातील टॉप-10 कृषी निर्यातदार देशांच्या यादीत समावेश, तांदूळ निर्यातीमध्ये थायलँडला टाकले पाठीमागे

Dr. Rajendra Malpani | पर्यटनासाठी गेलेले डॉ. राजेंद्र मालपाणी यांचा गुजरातमध्ये मृत्यू

Anti Corruption Trap | मानधनाचे बिल मंजूरीसाठी लाच घेणारे दोन डॉक्टर ACB च्या जाळ्यात

Pune Trains Cancelled | मुसळधार पावसामुळे पुणे- अहमदाबाद, वास्को-हजरत निजामुद्दीन, मुंबई-हैदराबाद ‘या’ एक्सप्रेससह 14 विशेष गाड्या रद्द

Gillian Anderson | माझे स्तन बेंबीपर्यंत गेले तरी मी ब्रा घालणार नाही, अभिनेत्रीचा निर्णय