6 महिन्यापासुन दररोज कपड्याच्या दुकानात येते ‘गाय’, लोक करू लागलेत ‘पुजा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्रप्रदेशच्या कडपा जिल्ह्याच्या मैदुकुर भागात मागील 6 महिन्यांपासून एका गाईला एक अनोखी सवय लागल्याची चर्चा सुरु आहे. ही गाय काही तासांसाठी स्थानिक बाजारात कपड्यांच्या दुकानात आराम करताना दिसत आहे. श्री साईराम क्लॉथ शोरुम नावाच्या एका दुकानात ही गाय बसते आणि या गाईला दुकानाच्या मालकाने आपल्या व्यवसायात शुभकारक मानले आहे.

दुकानाने मालक पी. ओबइया यांनी सांगितले की, सध्या वातावरणात उष्णता आहे. एक दिवस अचानक ही गाय दुकानात शिरली आणि पंख्याखाली येऊन बसली. त्यानंतर 2-3 तास आराम केल्यानंतर निघून गेली. पहिल्यांदा तर गाईला दुकानात शिरताना पाहून आश्चर्यचकित झाले. आम्ही गाईला दुकानातून बाहेर घालवण्याचा प्रयत्न केला, परंतू गाय हलली नाही. काही वेळ आराम करुन गाय निघून गेली.

दुकानात कधी घाण केली नाही
तेव्हापासून या दुकानात आराम करण्याची गाईला सवय लागली. दुकानाच्या मालकाने सांगितले की आमच्या दुकानात येण्याची गाईला सवय लागली आहे. पहिल्यांदा आम्हाला वाटलं की याचा परिणाम व्यावसायावर होईल परंतू आमच्या व्यवसायात भरभराट आली. विशेष म्हणजे गाईने दुकानात कधी घाण केली नाही.

दुकान मालकाची पत्ना करते पूजा
ओबइयाची पत्नी रोज गायचे आगमन झाले की दुकानात शुभ संकेत मानते, एवढेच नाही तर त्यांनी गाईची पुजा करण्यास देखील सुरुवात केली आहे.

Visit : Policenama.com