CP Bipin Kumar Singh | परमबीर आणि वाझे भेटीवर नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांचा खुलासा; म्हणाले – ‘आम्हाला काही माहिती नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  CP Bipin Kumar Singh | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) हे दोघे काल (सोमवारी) चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) चौकशीबाबत हजर होते. त्यादरम्यान परमबीर आणि वाझे यांच्यात जवळजवळ तासभर भेट झाली. यावरुन मुंबई पोलिस चौकशी करणार अशी चर्चा होती. तर, परमबीर सिंग आणि वाझे यांच्यातील कथित भेटीबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. असं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग (CP Bipin Kumar Singh) यांनी म्हटलं आहे.

 

पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंग  म्हणाले की, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग आणि त्यांचे माजी सहकारी आणि
बडतर्फ पोलिस सचिन वाझे यांच्यातील कथित भेटीबाबत “आमच्याकडे कोणतीही माहिती नाही” असं त्यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, परमबीर आणि सचिन वाझे यांनी केबिनमध्ये बसून जवळपास तासभर चर्चा केल्याची माहिती समोर आली.
यानंतर आता मुंबई पोलीस (Mumbai Police) या भेटीचा तपास करणार आहेत.
या भेटीसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले आहे.
अशा प्रकारे दोघांना भेटण्याची परवानगी कुणी दिली आणि त्या भेटीत नेमकं काय झालं, याचा तपास देखील पोलिस करत आहेत.

 

Web Title : CP Bipin Kumar Singh | we do not have any information revealed navi mumbai police commissioner Bipin Kumar Singh about parambir singh and sachin waze

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Noida Crime | पती गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला, चप्पल लपवण्यास विसरला अन् पत्नीच्या तावडीत सापडला; पत्नीने केले असे काही..

PCMC Recruitment 2021 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी बंपर भरती; 75 हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या

Nitesh Rane-Aditya Thackeray | नितेश राणेंनी लिहीलं आदित्य ठाकरेंना पत्र, काढले शिवसेना अन् BMC च्या नियोजनाचे वाभाडे