Nitesh Rane-Aditya Thackeray | नितेश राणेंनी लिहीलं आदित्य ठाकरेंना पत्र, काढले शिवसेना अन् BMC च्या नियोजनाचे वाभाडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Nitesh Rane-Aditya Thackeray | राणे कुटुंबीय आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील संघर्ष संपूर्ण राज्याला माहित आहे. काही दिवसांपूर्वीच दोघातील संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नारायण राणेंचे (Narayan Rane) पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राणे यांनी थेट राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना एक पात्र लिहिले आहे त्यामध्ये त्यांनी कोरोनाकाळात शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेल्या नियोजनाचे वाभाडे काढले आहेत. इतकच नाही तर महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. (Nitesh Rane-Aditya Thackeray)

 

या पत्रात नितेश राणे म्हणतात की, कोरोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले आहेत.
त्या कठीण काळात महाविकास आघाडी सरकारने व मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं आहे.
ऑक्सिजन गळती, ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला.
रुग्णालयात लागनाऱ्या आगीच्या घटना यामुळे आरोग्य विभागाचे धिंडवडे निघाले.
अशा परिस्थितीत ही आपल्या कुटुंबाचा विचार न करता फ्रंटलाईन वर्कर, कोविड वॉरिअर्सनी सामान्य नागरिकांची अहोरात्र सेवा केली.
मात्र सरकारने त्यांच्या नशिबी फक्त फरफट आणून ठेवली. (Nitesh Rane-Aditya Thackeray)

 

कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना सरकार साधं विमा कवच देऊ शकलं नाही. याच काळात पगार न मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना आंदोलन करावं लागल.
कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना मदत करण्याच्या नुसत्या घोषणा झाल्या.
राजकीय स्वार्थासाठी ज्या फ्रंटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवलं केल त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी सेनेला पूर्ण करता आलेला नाही.

 

मुंबईत पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर यांच्या लसीकरणाची मोहिम २६ जानेवारीपासून राबवण्यात आली होती.
परंतु या कर्मचाऱ्यांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही.
आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर असे सुमारे ९४ हजार जनांचे लसीचे दोन डॉस झाले नाहीत.
ही अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका नितेश राणेंनी केली.

महापालिकेने आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाची मोहिम हाती घेतली. ७ लाख ५६ हजार ५३९ जणांचे लसीकरण केले.
यामध्ये फक्त ४ लाख २५ हजार ४६४ जनांचा केवळ पहिलाच डोस झाला आहे. तर त्यातील केवळ ३ लाख ३१ हजार ७५ जणांचेच दोन डोस पूर्ण झाले आहेत.
म्हणजे ९४ हजार ३८९ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सचा फक्त एकच डोस झाला आहे.
परंतु डोसऱ्या डोसबाबत महापालिकेचे धोरण उदासीन आहे.
कोरोनावर आपल्या नाकर्तेपणाचा खापर फोडायचं आणि दुसरीकडे फ्रंटलाईन वर्कर्संनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं असं स्वार्थी धोरण सत्ताधारी शिवसेना राबवत आहे.
हे अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

 

कोरोनाचा नवा व्हेरियंट आला असून त्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळत मुंबई महापालिकेत आढावा बैठक घेतली.
पण हि वस्तुस्थिती लपवली गेली असेल याची मला खात्री आहे म्हणूनच पत्राद्वारे आपल्या निर्दशनास आणून देऊ इच्छीतो की महानगर पालिकेचे फ्रंटलाईन वर्कर तथापी आरोग्य कर्मचारी यांना असा संशय येऊ नये कि ठाकरे सरकार संधीसाधूपणाचं राजकारण तर करत नाही ना? असा सवालही राणेंनी उपस्थित केला आहे.

 

Web Title : Nitesh Rane-Aditya Thackeray | nitesh rane writes letter aditya thackeray criticism shiv sena led state government and BMC

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shah Rukh khan | देवदासची शूटिंग करत असताना शाहरूख खान होता ‘या’ गोष्टीवरून त्रस्त, तब्बल 19 वर्षानंतर केला खुलासा…

Sara Ali khan | बॉडीगार्डच्या ‘या’ कृत्यामुळं सारा अली खानला मागावी लागली माफी, व्हिडिओ झाला व्हायरल

Chitra Wagh | ‘राऊतांची कोल्हेकुई, नवाब मलिक दाऊद का भाई’ – चित्रा वाघ