CP Sadanand Date | सदानंद दातेंच्या ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन; डॉ. अभय बंग म्हणाले – ‘सत्तेच्या संगीत खुर्चीमध्ये पोलिसांपुढे लोकशाही टिकविण्याचे आव्हान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – CP Sadanand Date | समकालीन प्रकाशनातर्फे मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते (CP Sadanand Date) यांच्या ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग (Dr. Abhay Bang) आणि निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. मीरा चड्डा-बोरवणकर (Meera Chadha Borwankar) यांच्या हस्ते शनिवारी झाले. ‘सत्तेच्या संगीत खुर्चीमध्ये राजकीय आदेश झुगारून देत लोकशाही टिकवण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे,’ असं मत डॉ. अभय बंग यांनी यावेळी व्यक्त केले.

 

या कार्यक्रमादरम्यान आनंद अवधानी (Anand Awadhani) उपस्थित होते. त्यावेळी बोलताना अभय बंग म्हणाले, ‘सत्तेची भीती वाटत असल्याने राज्यकर्त्यांचे आदेश ऐकण्याखेरीज व्यवस्थेला दुसरा इलाज नसतो. आम्हाला अराजक नको असेल तर राज्यघटनेचे ऐकण्याचे स्वातंत्र्य पोलीस दलाला दिले पाहिजे. सदानंद दाते (CP Sadanand Date) यांचे पुस्तक हे त्यांचे सत्याचे प्रयोग आहेत, तसेच, वारंवार टीका केल्याने व्यवस्था सुधारण्याचे मार्ग खुंटतात. त्यामुळे क्रांतिकारी नव्हे तर सुधारणावादी मार्गाने काम करण्यावर त्यांचा भर असल्याचं ते म्हणाले.

 

 

‘दाते यांचे पुस्तक पोलीस दलातील सेवा आणि व्यक्तिगत जीवनातील अनुभवांवर आधारित असूनही ते रंजक झाले आहे.
पोलिस दलामध्ये पोलीस अधिकाऱ्याला महत्त्व दिले जाते. पण शिपाई प्रथम हे सूत्र महत्त्वाचे आहे.’
असं बोरवणकर यांनी यावेळी म्हटलं आहे. ‘पोलीस व्यवस्थेकडे तटस्थतेने पण सहृदयतेने पाहिले,
त्यातून हे लेखन आकाराला आले आहे. व्यक्ती आणि समाज यामध्ये व्यवस्था हा दुवा आहे.
समाज सुदृढ होण्यासाठी त्रुटी दूर करत या व्यवस्था बळकट कराव्या लागतील.’ असं सदानंद दाते म्हणाले.

 

Web Title :- CP Sadanand Date | Publication of Sadanand Date’s book ‘Records of a Man in a Uniform’; Dr. Abhay Bang says – ‘Challenge of maintaining democracy before the police in the music chair of power’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा