क्रेनची दुचाकीला धडक, पोलिसाचा मृत्यू

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन –   क्रेनची दुचाकीला जबर धडक बसून झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचा-याचा मृत्यू झाला. कुर्ली फाट्याजवळ ही घटना घडली. या प्रकरणी क्रेनचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

सचिन सुदेश कुबल (वय 38) असे अपघातात ठार झालेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. राकेशकुमार यादव (वय 30) असे अटक केलेल्या क्रेनचालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कुबल हे भाटये येथून गोळपच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते. यावेळी त्यांच्यासमवेत दुचाकीवर मागे भरत पद्मसिंग बोहरा हे बसले होते. समोरून येणा-या क्रेनने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात सचिन कुबल गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.