Creative Foundation-Enabler Charitable Trust | दिव्यांगांच्या सक्ष्मीकारणासाठी सर्वोतोपरी मदत करणार – चंद्रकांत पाटील (VIDEO)

10 दिव्यांगांना व्हीलचेयर भेट - शंभराव्या मन की बात निमित्त शंभर दिव्यांगांना मदत करणार - संदीप खर्डेकर.

दिव्यांगांनी एकत्र येऊन ऐकली पंतप्रधान नरेंद्र मोदींची शंभरावी मन की बात

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि एनॅबलर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे (Creative Foundation-Enabler Charitable Trust) आज दिव्यांग बंधू भगिनींसाठी एकत्रित पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) “मन की बात” चा (Mann Ki Baat 100 Episode) शंभरावा भाग ऐकण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिव्यांगांच्या कल्याणासाठी तत्पर असून त्यांनी एक मन की बात चा भाग हा दिव्यांगांना समर्पित केला होता, म्हणूनच आज दिव्यांग बंधू भगिनींसमवेत शंभरावा भाग ऐकण्याचे नियोजन केले असे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) म्हणाले. शंभराव्या भागाचे औचित्य साधून शंभर दिव्यांगांना रोजगारासाठी मदत करणे, व्हीलचेयर भेट देणे, शस्त्रक्रिया करणे, बॅटरी वर चालणारे वाहन उपलब्ध करणे असा संकल्प सोडला असून आज उद्योजक संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दहा दिव्यांगांना व्हीलचेयर भेट देऊन ह्या उपक्रमास प्रारंभ करत असल्याचे संदीप खर्डेकर आणि संयोजिका मंजुश्री खर्डेकर (Manjushree Khardekar) यांनी सांगितले. (Creative Foundation-Enabler Charitable Trust)

 

 

 

“दिव्यांगांच्या प्रतीचे कोणतेही सेवाकार्य हे पुण्याचे काम असून अश्या प्रकारे प्रसिद्धीच्या मागे नं धावता समर्पित वृत्तीने सेवाकार्य करणारे उद्योजक संजीव अरोरा, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर आणि एनॅबलर चॅरिटेबलं ट्रस्टचे संस्थापक अमोल शिनगारे (Amol Shingare) यांच्यासारख्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे ना. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.” दिव्यांगांना व्हीलचेयर भेट देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मी पुण्यातील दिव्यांगांची यादी तयार केली असून येणाऱ्या काळात कोणताही दिव्यांग व्यक्ती हा सक्षम कसा होईल यावर मी लक्ष केंद्रित केले आहे असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकारच्या (State Government) योजनांचा लाभ तर दिव्यांग बंधू भगिनींना मिळवून देऊच पण पुणे शहरात संजीव अरोरा सारखे उद्योजक, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संदीप खर्डेकर व मुकुलमाधव फाउंडेशनचे सचिन कुलकर्णी (Sachin Kulkarni) यासारखी अनेक व्यक्ती काम करत आहेत ज्यांच्या माध्यमातून दिव्यांगांना जे जे लागेल ते ते पुरविण्याचा माझा ही प्रयत्न असल्याचेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. (Creative Foundation-Enabler Charitable Trust)

 

मन की बात कार्यक्रमादरम्यान दिव्यांग बंधू भगिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टाळयांच्या गजरात अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, शिक्षण समिती अध्यक्ष व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, एनॅब्लर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अमोल शिनगारे व राहुल अवघडे, उद्योजक संजीव अरोरा, मुकुलमाधव फाउंडेशनचे सचिन कुलकर्णी, परशुराम सेवा संघाचे विश्वजित देशपांडे, भाजप आयटी सेलच्या प्रमुख कल्याणी खर्डेकर, राजू दाभाडे, ऍड. अमोल काजळे पाटील, सतीश कोंडाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. (Pune News)

 

संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन, अमोल शिनगारे यांनी आभार प्रदर्शन तर मंजुश्री खर्डेकर यांनी उपस्थितांचे सत्कार केले. (Pune Marathi News)

 

Web Title :  Creative Foundation-Enabler Charitable Trust | Chandrakant Patil will do his best for the welfare of the disabled

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा