Creative Foundation-Global Group | देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल ग्रुप व क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे ससून सोफोश ला विविध वस्तू भेट

निष्कलंक चारित्र्य आणि लोकाभिमुख संवेदनशील नेतृत्व म्हणजे देवेंद्रजी फडणवीस – धीरज घाटे

देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे विकासपुरुष आणि खऱ्या अर्थाने लोकनेते – संदीप खर्डेकर

पोलीसनामा ऑनलाइन – Creative Foundation-Global Group | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे निष्कलंक चारित्र्य असलेले नेते असून महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकाभिमुख असे त्यांचे नेतृत्व आहे. नेतृत्व कसे असावे याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र असून अत्यंत संवेदनशील असलेल्या देवेंद्रजींनी इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे व्यथित होऊन वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा कार्य करण्याचा निर्धार पक्ष कार्यकर्त्यांनी केला असून त्यास अनुसरून राज्यभर झालेले कार्यक्रम हे भारतीय जनता पार्टीच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या सूत्रानुसार असल्याचे ही धीरज घाटे (Dheeraj Ghate) म्हणाले. (Creative Foundation-Global Group)

देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने सेवा सप्ताह साजरा केला जात आहे.त्यास अनुसरून आज ग्लोबल ग्रुप आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने ससून मधील सोफोश आणि श्रीवत्स संस्थेस 100 खुर्च्या आणि स्वयंपाकघरात उपयोगी पडणारे साहित्य भेट देण्यात आले. यावेळी भाजप चे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष धीरज घाटे, ग्लोबल ग्रुप चे चेयरमन संजीव अरोरा, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर (Manjushri Sandeep Khardekar), व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अरविंद तथा पप्पूशेठ कोठारी, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, मा. नगरसेवक दीपक पोटे, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे,ओबीसी आघाडीचे सतीश गायकवाड,कुलदीप सावळेकर, सुभाष जंगले, विकास लवटे,इ मान्यवर उपस्थित होते. (Creative Foundation-Global Group)

देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने सामान्यांचे कैवारी असून लोकनेते आहेत.
ते ह्या राज्याचे विकासपुरुष असून त्यांचा वाढदिवस हा क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने पुण्यात विविध संस्थांना मदत
करून सेवाकार्याने साजरा करण्यात येतं आहे असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
आज सोफोश ला आवश्यक साहित्य भेट देऊन सुरुवात केली आहे, येणाऱ्या काळात ह्या उपक्रमात आणखी भर
टाकण्यात येणार असल्याचे ग्लोबल ग्रुप चे अध्यक्ष संजीव अरोरा म्हणाले.
सोफोश च्या वतीने डॉ.शर्मिला सय्यद यांनी हे साहित्य स्वीकारले व अनाथ मुलांना आधार देण्याच्या क्रिएटिव्ह फाउंडेशन
व ग्लोबल ग्रुप चे कार्य आम्हाला ऊर्जा देणारे असल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Alia Bhatt | आलियाच्या बॅगमध्ये तिच्या पेक्षा राहाचे सामान असते जास्त; “माझी बॅग आता माझी राहिली नाही”

Samantha Ruth Prabhu | सामंथाने अवघ्या 4 डिग्रीमध्ये घेतला थंडगार आइस बाथ; व्हिडिओ व्हायरल