Credit Card | क्रेडिट कार्ड वापरताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष ठेवल्यास करू शकता पैशांची बचत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Credit Card | तुमच्यापैकी अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर दैनंदिन जीवनात शॉपिंग (Shopping) , बिल भरणा (Bill Payments), आर्थिक व्यवहार इत्यादी सारख्या गोष्टींसाठी करतात. तुम्ही क्रेडिट कार्डसंबंधीत (Credit Card) काही चांगल्या सवयी अवलंबून त्यावरील डेट किंवा कर्जापासून वाचू शकता तसेच चांगली बचत (Save Money) सुद्धा करू शकता. क्रेडिट कार्ड डेटपासून वाचणे आणि चांगली बचत (Saving) करण्याच्या पद्धती जाणून घेवूयात.

 

1. व्याज भरण्यापासून वाचणे (Avoid paying interest)
जर तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे चांगली बचत करायची असेल तर सर्वप्रथम व्याज भरणा करण्यापासून बचाव करावा लागेल. यासोबत अनेक के्रडिट कार्डचा वापर सुद्धा टाळला पाहिजे. तुमची एकुण क्रेडिट मर्यादा मासिक उत्पन्नापेक्षा (monthly income) जास्त असू नये. अन्यथा, तुम्हाला पुढील बिलाचा भरणा करण्यात अडचण येईल.

 

2. वेळेवर बिल भरणे (Paying bills on time)
जर तुम्ही क्रेडिट धारक असाल तर बिल भरणा योग्य वेळी केला पाहिजे. यातून तुम्ही अनावश्यक विलंबापासून वाचू शकता आणि तुमच्यावर एक्स्ट्रा इंट्रेस्ट रेटचा (Extra Rate of Interest) भार पडणार नाही.

3. क्रेडिट भरणा सायकल वाढवण्यासाठी चर्चा करा
तुमच्या क्रेडिट कार्डचा भरणा करण्याची तारीख वाढवण्यासाठी बँकेशी चर्चा केली पाहिजे. तुमच्याकडे पैसे भरण्यासाठी जेवढा जास्त कालावधी असेल पैसे भरण्यास तेवढा जास्त वेळ मिळेल. (Credit Card)

 

4. क्रेडिट कार्ड रिवॉर्ड (credit card reward)
तुम्ही पेमेंट करण्यासाठी जेवढा जास्त क्रेडिट कार्डचा वापर करता, तुम्हाला तेवढ्याच प्रमाणात काही के्रडिट रिवॉर्ड मिळतात. या क्रेडिट रिवॉर्डचा वापर करून चांगली बचत करू शकता.

 

5. क्रेडिट कार्डचा वापर करताना नियमांचे पालन (Follow the rules when using a credit card)
क्रेडिट कार्ड वापरताना नियमांचे पालन करणे आवश्यक असते.
अनेकदा असे होते की, क्रेडिट कार्डचा वापर ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त केला जातो.
ज्यामुळे आपल्यावर ईएमआय आणि कर्जाचे ओझे वाढते.

 

 

Web Title :- Credit Card | keeping these things in mind while using credit card can save money

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

RIL Jio Happy New Year Offer | Jio नं नववर्षानिमित्त आणली भन्नाट ऑफर, जाणून घ्या काय मिळणार ‘या’ पॅकमध्ये?

Corporator Jyoti Ganesh Kalmakar | विविध अंगांने शहराचा विकास व्हावा – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

PM Kisan Yojana | 5 दिवसानंतर PM मोदी कोट्यवधी शेतकर्‍यांना देणार खुशखबर ! खात्यात येतील 4000 रुपये, लवकर करा ‘हे’ काम अन्यथा रखडू शकतो हप्ता