Corporator Jyoti Ganesh Kalmakar | विविध अंगांने शहराचा विकास व्हावा – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Jyoti Ganesh Kalmakar | ‘स्थानिक जनतेला प्राथमिक नागरी सुविधा पुरवणे हे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचे कर्तव्यच आहे.परंतु यासह सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पुरक सुविधाही पुरवल्या गेल्या पाहिजेत’ असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केले. नगरसेविका ज्योती गणेश कळमकर (Corporator Jyoti Ganesh Kalmakar) यांच्या विकास निधीतून नव्वद लाख रुपये खर्चातून बाणेर (Baner) सर्वे क्रमांक ५४ रोहन लेहर सोसायटी जवळ मोहन नगर येथील कै.बाळकृष्ण गुलाबराव तापकीर या उद्यानाचे उदघाटन आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

 

 

या प्रसंगी नगरसेवक अमोल बालवडकर (Corporator Amol Balwadkar), नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर (Corporator Swapnali Pralhad Saikar), प्रभाग अध्यक्षा उमा गाडगीळ (Uma Gadgil) ,शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर (Ganesh Kalmakar) , गुलाबराव तापकीर (Gulabrao Tapkir), संजय पाडाळे, काळूराम गायकवाड, शरद भोते, संतोष तापकीर,अर्जुन शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले ‘बाणेर भागातील भाजपचे नगरसेवक हे स्थानिक संदर्भ शोधून प्रत्येक ठिकाणी योग्य व्यक्तींची नावे देऊन त्या त्या व्यक्तींचा योग्य सन्मान करत आहेत हि आनंदाची बाब आहे. (Corporator Jyoti Ganesh Kalmakar)

 

तसेच प्राथमिक सुविधा पुरवतानाच येथील नागरिकांच्या आणखी गरजा ओळखून इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावेत.’नव्वद लाख रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या या उद्यानात लहान मुलांसह सर्व वयोगटातील नागरीकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.यावेळी पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेले नागरिक व वसुंधरा अभियान संस्थेसह इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.


Web Title :-
Corporator Jyoti Ganesh Kalmakar | The city should be developed by various organs – BJP state president Chandrakant Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 


हे देखील वाचा

 

PM Kisan Yojana | 5 दिवसानंतर PM मोदी कोट्यवधी शेतकर्‍यांना देणार खुशखबर ! खात्यात येतील 4000 रुपये, लवकर करा ‘हे’ काम अन्यथा रखडू शकतो हप्ता

ST Workers Strike | ‘मी खुर्चीत असतो तर…’, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन नाना पटोलेंनी व्यक्त केली नाराजी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 132 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 75 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्याच्या कर्वेनगर परिसरात भरदिवसा 20 वर्षीय युवकाचा तलवारीने सपासप वार करून खून; प्रचंड
खळबळ