RIL Jio Happy New Year Offer | Jio नं नववर्षानिमित्त आणली भन्नाट ऑफर, जाणून घ्या काय मिळणार ‘या’ पॅकमध्ये?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RIL Jio Happy New Year Offer | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या मुकेश अंबानी यांच्या जिओ (Jio) ने ख्रिसमसनिमित्त शनिवारी (25 डिसेंबर 2021) यूजर्सला भेट दिली. जिओने 2,545 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानची एक नवीन, मर्यादित कालावधीची हॅप्पी न्यू ईयर ऑफर (RIL Jio Happy New Year Offer) आणली आहे. जिओने आपल्या काही लोकप्रीय प्लानची वैधता कमी करून ग्राहकांना जास्त किंमतीचे प्लान खरेदी करण्यास भाग पाडले असतानाच हा न्यू इयर प्लान आणल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळू शकतो.

 

जिओ वार्षिक प्रीपेड प्लान, जो सामान्यपणे 336 दिवसांच्या वैधतेसह येतो, आता 29 दिवसांच्या अतिरिक्त वैधता देत आहे. म्हणजे जियोचा 2,545 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान संपूर्ण 365 दिवस चालेल. ही नवीन वर्षाची एक लिमिटेड ऑफर आहे. सोबतच सध्याचे आणि नवीन रिलायन्स यूजर्स याचा लाभ घेऊ शकतात. हा प्लान प्रतिदिन 1.5GB हाय-स्पीड डेटासह येतो.

 

रिलायन्स जिओच्या 2,545 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दैनिक 100 एसएमएस, रोज 1.5GB हय-स्पीड डेटा आणि 336 दिवसांची वैधता मिळेल. ही ऑफर जिओच्या अधिकृत वेबसाइटसह माय जिओ अ‍ॅप (MyJio App) वर सुद्धा उपलब्ध आहे. (RIL Jio Happy New Year Offer)

 

वरील लाभांसह कंपनीचा 2,545 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान यूजर्सला जिओ टीव्ही (JioTV), जिओ सिनेमा (JioCinema), जिओ सिक्युरिटी (JioSecurity) आणि जिओ क्लाऊड (JioCloud) चे सदस्यत्व देतो.

जिओचा 2,545 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान केवळ एक मर्यादित कालावधीसाठी आहे.
कारण ही ऑफर दोन जानेवारी 2022 रोजी संपणार आहे. अतिरिक्त वैधता पाहिले असलेल्या ग्राहकांसाठी हा चांगला प्लान आहे.

 

जिओ हॅप्पी न्यू ईयर प्लान :

किंमत : 2545

डाट : 1.5 जीबी रोज

कॉल : अमर्यात (मोफत)

एसएमएस : रोजाना 100

वैधत : 336 दिवस + 29 दिवस जास्त = 365 दिवस

जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रीप्शन

 

Web Title :- RIL Jio Happy New Year Offer | rils mukesh ambani gave gift to customers as jio brings happy new year offer know full details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSY | दर महिना जमा करा इतके रुपये, मुलीला मिळतील एकरकमी 65 लाख; जाणून घ्या

Corporator Jyoti Ganesh Kalmakar | विविध अंगांने शहराचा विकास व्हावा – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

Pune BJP | अटलशक्ती महासंपर्क अभियाना’ला प्रभाग 16 मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद ! 15500 हून अधिक घरांमध्ये संपर्क