BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना ह्दयविकाराचा झटका, हॉस्पीटलमध्ये दाखल

वृत्तसंस्था – बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना कोलकत्ता येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहिलेल्या गांगुली यांच्यावर कोलकत्ताच्या वुडलॅन्डस हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, अद्यापही गांगुली यांना नेमकं काय झालं हे अद्याप समजलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार गांगुली यांना ह्दयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करावी लागणार आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.