भारतीय क्रिकेटरांच्या डोक्याला ‘ताप’ देणारा हा क्रिकेटपटू अनिश्चित काळासाठी निलंबीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू  मोहम्मद शहझाद सारखाच काहीना काही कारणामुळे  चर्चेत असतो. आताही तो अशाच कारणामुळे  चर्चेत आला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने त्याला अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या नियमांचा भंग  केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघात आंतरराष्ट्रीय सर्वाधिक धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे. क्रिकेट मंडळाची परवानगी न घेता  त्याने परदेशी प्रवास केल्याने त्याच्यावर ही कारवाई केली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या पत्रकाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, “अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूला परदेशी प्रवास करण्यापुर्वी मंडळाची परवानगी द्यावी लागते.  मात्र शहझादने ही परवानगी  घेतली नाही.  मंडळाच्या शिस्तपालन समितीपुढे वीस आणि पंचवीस जुलैला त्याला  हजर राहण्यास सांगितले होते. मात्र तेव्हाही तो तिथे हजर राहिला नाही. मंडळाकडे चांगल्या दर्जाचे  प्रशिक्षण साहित्य असल्याने त्यासाठी परदेशी जाण्याची  आवश्यकता नाही. आता ईदच्या सुट्टीनंतर  घेण्यात येणाऱ्या बैठकीत त्याच्या शिक्षेवर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.” दरम्यान नऊ संप्टेंबरपासून बांग्लादेशाशी कसोटी सामने सुरु होणार आहेत.त्यामुळे संघाला शाहझादशिवाय  खेळण्याची तयारी संघाला करावी लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –