कौतुकास्पद ! ‘कॅन्सर’ झालेल्या प्रशिक्षकाला वाचविण्यासाठी मॅरेथॉन मध्ये धावला ‘हा’ क्रिकेटर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही वेळा आयुष्यात तुम्हाला जे मिळायला हवे ते मिळत नाही. इंग्लंडचा माजी क्रिकेटर ख्रिस रीड याच्याबाबतीत हि गोष्ट अंत्यत तंतोतंत लागू होते. ख्रिसचा जन्म १० ऑगस्ट १९७८ राजी इंग्लंडमध्ये झाला होता. त्याने इंग्लंडकडून प्रथमश्रेणी सामन्यात १६००० तर सीमित क्रिकेटमध्ये जवळपास ७००० धावा केल्या होत्या. मात्र इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून त्याला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने इंग्लंडकडून केवळ १५ कसोटी सामने आणि ३६ एकदिवसीय सामने खेळले.

त्याने १९९९ मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. न्यूझीलंडविरुद्ध हा सामना त्याने खेळला होता. मात्र या सामन्यात त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्यानंतर २००३ मध्ये त्याला एकदिवसीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर त्याने २००७ मध्ये आपला शेवटचा कसोटी सामना आणि २००६ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर तो जितका उत्तम खेळाडू आहे तितकाच उत्तम तो माणूस म्हणून देखील आहे. २००७ मध्ये ख्रिसने मदतनिधी जमवण्यासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात भरलेल्या एका मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. त्याने आपला प्रशिक्षक ट्रेवर वार्ड याच्यासाठी हा सहभाग नोंदविला होता. ट्रेवर वार्ड याचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर त्याच्या स्मृत्युपित्यर्थ पैसे जमवून ते कॅन्सरपीडितांना देण्यात येणार होते.

दरम्या, या मॅरेथानमध्ये ९० हजार नागरिकांनी सहभाग निंदवीला होता. त्यामध्ये ख्रिस हा ४३५८ व्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळं आपल्या प्रशिक्षकांसाठी हे कार्य करणाऱ्या ख्रिसचे जगभरातून सध्या मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त