शेन वॉर्नच्या ‘टोपी’नं सर डॉन ब्रॅडमन अन् MS धोनीलाही मागे टाकलं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या क्रिकेट जगतात सर्वाधिक चर्चा कोणत्या विषयाची सुरु असेल तरी ती ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नच्या कॅपची. ऑस्ट्रेलियात सध्या भीषण आग लागली आहे. त्यासाठी निधी गोळा करण्यासाठी वॉर्नकडून त्यांच्या ऑस्ट्रेलिया संघाच्या मानाच्या ग्रीन कॅपचा लिलाव सुरु करण्यात आला आहे. या टोपीच्या लिलावावर किती रुपयांची बोलली लावली जात आहे हे ऐकाल तर चक्रवालं.

ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या जंगलातील आगीमुळे प्राण्यांचे आणि झाडांचे फार मोठे नुकसान झाले. या परिस्थितीत काही जण थेट जंगलात दाखल झाले आहेत. काहींनी प्राण्यांचे जीव वाचवण्यास सुरुवात केली तर त्याचबरोबर बऱ्याच जणांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. काही जण आर्थिक मदत करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी मदत देखील जाहीर केली आहे. परंतु वॉर्नने आयडीयाची कल्पना लढवून आपली कॅप लिलावात ठेवली आहे. त्याच्या चाहत्यांकडून लिलावाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हा लिलाव 10 जानेवारी पर्यंत चालणार आहे. जेव्हा लिलाव सुरु झाला तेव्हा दोन तासात 2,75,000 डॉलर एवढी बोली लावली आहे. आज या कॅपवर 5 लाख 20 हजार 500 डॉलरची सर्वाधिक बोली लागली. आतापर्यंतच्या इतिहासात क्रिकेटमधील ही सर्वाधिक मोठी बोली आहे. याआधी सर्वाधिक बोली सर डॉन ब्रॅडमन यांच्या कॅपवर लागली होती. ब्रॅडमन यांच्या कॅपला 4 लाख 25 हजार डॉलर एवढी बोली मिळाली होती परंतु हा विक्रम आज वॉर्नच्या कॅपवर लावण्यात आलेल्या बोलीने मोडला.

2011 साली भारताने विश्वचषक जिंकला होता, धोनीच्या एका षटकाराने विश्वचषकावर भारतीचे नाव कोरले गेले. धोनीने ज्या बॅटने षटकार लगावला होता त्या बॅटचा काही दिवसांपूर्वी लिलाव झाला. या लिलावात 2 लाख 50 हजार डॉलरची बोली लागली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/