ICC World Cup 2019 : पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचणार ! पण, त्यासाठी मैदानात ‘झाड’ हवं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना होत असून या सामन्यात काही चमत्कार घडला तर पाकिस्तान या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकेल. यजमान इंग्लंडने याआधी भारत आणि नंतर न्यूझीलंडला या स्पर्धेत पराभूत करून पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या आशा देखील संपुष्टात आल्या. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड सेमीफायनलमध्ये जाणारा तिसरा संघ ठरला आहे.

image.png

न्यूझीलंडचे सध्या पाकिस्तानपेक्षा दोन गुण जास्त असून आजच्या सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानदेखील ११ गुणांवर जाईल. मात्र तरीदेखील न्यूझीलंडचा रनरेट जास्त असल्याने पाकिस्तान या स्पर्धेच्या सेमीफायनलमधून बाहेर पडणार आहे. सध्या पाकिस्तानचा रनरेट हा मायनस असून न्यूझीलंडचा रनरेट प्लसमध्ये असल्याने त्यांना काहीही चिंता करण्याची गरज नाही. मात्र बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला मोठ्या धावांनी विजय मिळवावा लागणार अशी गणिते सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यावर प्रेक्षकांनी तसेच नेटिझन्सनी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानची हुर्रे उडवली आहे. काही जणांनी पोस्ट करत पाकिस्तानची मजा घेतली असून सोशल मीडियावर पाकिस्तानी संघाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

या सामन्यात पाकिस्तान टॉस हारला आणि बांगलादेशने पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला तर तिथेच पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडणार. त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर सध्या एकच पर्याय आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला ४०० धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. त्यानंतर बांग्लादेशच्या संघाला ८४ धावांवर ऑलआऊट करावे लागेल त्याचबरोबर जर त्यांनी ३५० धावा केल्या तर बांगलादेशला ३८ धावांवर ऑलआऊट करावे लागेल. अशी गणिते सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर काही जणांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले कि, एलियन बोलवून सर्व बॉलवर षटकार मारा म्हणजे बांगलादेशवर सहज विजय मिळवता येईल.

image.png

याशिवाय एका युजरनं १८९४ मधील एका घटनेचा उल्लेख करत त्याची पुनरावृत्ती झाल्यास पाकिस्तानला मोठं आव्हान उभा करता येईल असं म्हटलं आहे. त्याचबरोबर काहींनी म्हटले आहे कि, मैदानावर झाड असेल तरच पाकिस्तानला विजय शक्य आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पाकिस्तानी संघाला ट्रोल केलं जात असताना पाकिस्तानचा कर्णधात सरफराज अहमद याने ५०० धावा बनवण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याने या सामन्यात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय