ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या ‘या’ माजी खेळाडूचा भारतावर निशाणा ; विंडीजकडून शिकण्याचा ‘सल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आता रंगत आली असून अंतिम चार स्थानांसाठी पाच संघात टक्कर असून सध्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर असून भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी असून इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे स्पर्धेत आता चौथ्या क्रमांकासाठी रेस असून पाकिस्तानसह श्रीलंका देखील सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी आस लावून बसली आह

त्याचबरोबर रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवला असता तर भारतीय संघाचे देखील सेमीफायनलमधील स्थान नक्की झाले असते,मात्र ३३८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता भारताला आज बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करण्याची चांगली संधी आहे.

त्यानंतर आता इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवावर बोलताना इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने विंडीजच्या आडून भारतीय संघावर टीका केली आहे. काल झालेल्या सामन्यात विंडीजने श्रीलंका विरुद्ध ३३९ धावांचा पाठलाग करताना चांगली लढत दिली. सामन्यात कोणतेही जास्त कष्ट न करता त्यांनी श्रीलंकेला चांगली टक्कर दिली. मात्र विंडीजने तो सामना गमावला जरी असला तरी त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक होत आहे. याच सामन्याचे उदाहरण देत इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉन याने भारतीय संघावर निशाणा साधला आहे. मोठे लक्ष्य डोळ्यासमोर असूनही न खचता त्याचा पाठलाग करण्याचे प्रयत्न कस्र करावे, हे विंडीजकडून शिकावे असा टोमणा वॉन याने लगावला.

रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या १० षटकांत भारतीय संघाने विजयासाठी फार प्रयत्न केले नाहीत, यावरून सोशल मीडियात देखील भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्याचबरोबर अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी देखील भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. दरम्यान, या स्पर्धेत भारतीय संघाचे बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्याबरोबर सामने बाकी असून दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी भारतीय संघाकडे आहे.

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ‘ही’ काळजी

‘बीफ’ खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका अधिक

यकृताच्या समस्येसाठी ‘कच्ची पपई’ ठरेल रामबाण उपाय

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढा

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामात भ्रष्टाचार, सभापतींचे चौकशीचे आदेश

 

Loading...
You might also like