IND vs NZ : दुसऱ्या ‘वन-डे’ मध्ये विजयासाठी ‘संघात’ होऊ शकतात मोठे ‘बदल’, ‘या’ खेळाडूला मिळू शकतो ‘डच्चू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने टी – 20 मालिकेत 5 – 0 असा शानदार विजय आपल्या नावे केला. परंतु नव्याने सुरु झालेल्या वन डे सामन्यात भारताचा न्यूझीलँडनी पराभव केला. परंतु आता दुसऱ्या सामन्यात देखील भारताचा पराभव झाला तर त्यांना ही मालिका गमवावी लागेल. त्यामुळे भारतीय संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर संघातून एका खेळाडूला डच्चू देण्यात यावा असे म्हणले जात आहे.

टी – 20 मालिकेतील मानहानीकारक पराभव, कर्णधार केन विलियम्सला झालेली दुखापत या दुहेरी संकटातून वाट काढत यजमान न्यूझीलँड संघाने वन डे मालिकेत दणक्यात सुरुवात केली. भारताने 347 धावांचे आव्हान समोर ठेवले होते याला प्रत्युत्तर देत किवीच्या संघाने उत्तम अशी खेळी केली. कोणत्याही घाई शिवाय न्यूझीलँडने हे लक्ष्य सहज पूर्ण केले. न्यूझीलँड संघाच्या विजयाचे श्रेय रॉस टेलर, हेन्नी निकोल्स आणि कर्णधार टॉम लॅथमला जाते. या विजयासह न्यूझीलँडने 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात भारताचा पराभव झाला परंतु तसे पाहिले तर भारताला या मैदानावर बरेच पराभव पाहावे लागले आहेत.

मालिकेतील पहिल्या पराभवानंतर बोलताना कोहली म्हणाला की, न्यूझीलँडने या सामन्यात चांगली कामगिरी केली. आम्हाला वाटले होते की, आम्ही उभारलेली धावसंख्या पुरेशी होती, परंतु रॉस टेलरसारखा अनुभवी फलंदाज न्यूझीलंडकडे होता. टॉम लॅथमने देखील चांगली फलंदाजी केली. या दोघांनी आमच्याकडून सामना हिरावून घेतला. त्यामुळे या विजयाचे श्रेय टेलर आणि लॅथमला जाते.

पहिल्या वन डे सामन्यात भारताने मोठी धावसंख्या रचली होती. पण भारताच्या गोलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी न झाल्याने भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताला दुसरा सामना जिंकायचा असेल तर त्यांना गोलंदाजीमध्ये काही बदल करावे लागतील. संघात नव्या गोलंदाजांना संधी दिल्यास सामन्याचा पलटू शकतो असे म्हणले जात आहेत.

दुसऱ्या वनडेसाठीच्या संघ निवडीवर बोलताना फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला की, वन डे सामन्यांमध्ये मधली षटके फार महत्वाची असतात. त्यासाठी संघात एक अतिरिक्त फिरकीपटू असायला हवा. कारण न्यूझीलँडचे फलंदाज वेगवान गोलंदाजांचा उत्तम पद्धतीने खेळतात. त्यामुळे भारताला जर दुसरा सामना जिंकायचा असेल तर त्यांनी संघात फिरकीपटू युजवेंद्र चहलला संधी द्यायला हवी.

हरभजन म्हणाला की, चहल आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडी भारताला विजय मिळवून देऊ शकते. परंतु चहलला संधी देण्यासाठी संघातून कोणत्या खेळाडूला काढायचे हा देखील प्रश्न असेल. परंतु चहलला संधी द्यायची असेल तर संघातून केदार जाधवला वगळू शकतो.