ICC World Cup 2019 : भारताबरोबर सामन्याआधीच इंग्लंडचे ‘हे’ दोन खेळाडू भिडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विंडीजचा १२५ धावांनी दणदणीत पराभव करत आपला पाचवा विजय साजरा केला. याचबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच भारतीय संघाने सेमीफायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ देखील सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र इंग्लंडचा सेमीफायनलाच रस्ता थोडा अवघड झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचे आव्हान थोडे कठीण झाले आहे. स्पर्धेत उरलेल्या दोन सामन्यांत विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांचा पुढील सामना उद्या भारताबरोबर होणार आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वी इंग्लडने माईंडगेम सुरु केला आहे. हा सामना त्यांच्यासाठी करा किंवा मरा अशा स्थितीत आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न इंग्लंड करणार आहे. मात्र त्याआधीच इंग्लंडचे खेळाडू नकारात्मक विचार करायला लागले आहेत.

इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यात युद्ध रंगले आहे. या सामन्याविषयी बोलताना जॉनी बेअरस्टो याने म्हटले की, संपूर्ण जगाला इंग्लडला पराभूत होताना बघायचं आहे. मात्र त्याच वेळी जोस बटलर याने मात्र त्याच्या मताशी असहमती दर्शवत म्हटले की, संपूर्ण जगातून इंग्लंडला पाठिंबा मिळत आहे. एका कार्यक्रमात बोलताना बेअरस्टोने म्हटले की, दोन पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या पाठीराख्यांनी इंग्लंडला पाठिंबा देणे बंद केले आहे. त्यामुळे आमच्याकडून त्यांना काही अपेक्षा नाहीत. मात्र यावर जोस बटलरने असहमती दर्शवली.

त्यानंतर या मतावर नाराज होत माजी कर्णधार मायकल वॉन याने जॉनी बेअरस्टो याला चांगलेच झापले आहे. त्याने यावेळी म्हटले की, बेअरस्टो चुकीचा आहे. आतापर्यंत कोणत्याच इंग्लंडच्या संघाला एवढं प्रोत्साहन दिलं नव्हतं पण या संघानेच लोकांना निराश केलं. या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर येऊन पुढचे सामने जिंका आणि सेमीफायनल गाठा असा सल्लाही मायकल वॉन यांनी दिला आहे.

दरम्यान, पाकिस्‍तान, श्रीलंका आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्याने इंग्लडचे सेमीफायनलमधील आव्हान कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांना उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गुणतालिकेत इंग्लंड चौथ्या स्थानावर असून त्यांना हे स्थान टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे.

अ‍ॅसिडिटीचा’ त्रास टाळण्यासाठी हे उपाय करा, होईल फायदा

घरातल्या या मसाल्याने रात्रीतून पिंपल्स होईल गायब …

कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव घेणार धम्मदीक्षा