वेस्टइंडिजचा क्रिकेटर कायरन पोलार्डचा ७ वर्षाचा ‘वनवास’ अखेर संपला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताविरुद्ध काल पार पडलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्ड याने शानदार खेळी करत आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात त्याने ४५ चेंडूत शानदार ५८ धावा केल्या. १४ धावांवर ३ खेळाडू गमावलेल्या विंडीजने पोलार्डने केलेल्या शतकी खेळीने २० षटकांत १४५ धावा उभारल्या.

किरॉन पोलार्ड हा त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जात असून ७ वर्षांनंतर त्याने टी-२० सामन्यात अर्धशतक झळकावले. पोलार्डने २०१२ मध्ये शेवटचे अर्धशतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले होते. त्या सामन्यात त्याने नाबाद ५४ धावांची खेळी केली होती. त्याने आतापर्यंत क्रिकेटच्या या प्रकारात फक्त ३ अर्धशतके झळकावली असून भारताविरुद्ध त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. या कालच्या सामन्यात त्याने त्याच्या अर्धशतकी खेळीत ६ षटकार मारले. त्याने या सामन्यात निकोलस पूर्ण सोबत चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

दरम्यान, भारतीय संघ या मालिकेत टी-२० सामन्यानंतर ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळणार असून पुढील आठवड्यापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –