IPL 2021 साठी मेगा ऑक्शनवर केव्हा होणार निर्णय ? BCCI नं संघांना दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापासून बरोबर चार महिन्यानंतर बीसीसीआय आयपीएलच्या 14 व्या सीझनचे आयोजन करेल. मात्र, त्यापूर्वी बीसीसीआई एक मोठ्या ऑक्शनचे आयोजन करेल किंवा नाही? या प्रश्नाचे उत्तर मिळणे बाकी आहे. बीसीसीआय या प्रश्नाचे उत्तर पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये देऊ शकते. बातम्यांनुसार बीसीसीआयने सर्व 8 संघांच्या मालकांना सांगितले आहे की, ते मेगा ऑक्शन (लिलाव) वर निर्णय डिसेंबरमध्ये घेतील. सोबतच सीझनमध्ये एका नवीन टीमला आणले जाईल किंवा नाही? या मुद्द्यावर सुद्धा डिसेंबरमध्ये निर्णय होईल.

डिसेंबरमध्ये होईल मेगा ऑक्शन, डिसेंबरमध्ये निर्णय !
बीसीसीआय सूत्रांनुसार, बोर्डाने सर्व टीमला सूचित केले आहे की, डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात बीसीसीआय मेगा ऑक्शनवर निर्णय घेईल. बीसीसीआय सूत्रांनी सांगितले, वेळ कमी आहे परंतु प्रत्येकाला एका फुल ऑक्शनच्या आयोजनाची प्रतिक्षा आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल 3 ते 4 आठवड्यांमध्ये या मुद्द्यांवर सांगेल. बीसीसीआय अधिकार्‍याने आयपीएलमध्ये नवीन टीम आणण्याच्या मुद्द्यावर काहीही सांगितले नाही. त्यांनी सांगितले की, सध्या या मुद्द्यावर बोलणे घाईचे ठरेल.

कोणत्या टीमला होणार मेगा ऑक्शन फायदा
पुढील वर्षासाठी जर मेगा ऑक्शन झाले तर त्याचा सर्वात जास्त फायदा चेन्नई सुपरकिंग्जला होईल. सीझनच्या शेवटच्या मॅचनंतर एमएस धोनीने देखील हे सांगितले आहे की. पुढील ऑक्शनम भविष्याचा विचार करून टीम उभी करावी लागेल. सीएसकेने याकडे इशारा सुद्धा केला आहे की, बीसीसीआयने त्यांच्याशी मेगा ऑक्शनच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. केवळ चेन्नई सुपरकिंग्जच नव्हे, राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैद्राबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी सुद्धा बीसीसीआयची या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. मात्र, काही टीम मेगा ऑक्शनच्या बाजूने दिसत नाहीत. वृत्तानुसार दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स याच्याविरोधात आहे. आता पाहूयात डिसेंबरमध्ये बीसीसीआय काय निर्णय घेते.