IPL मध्ये खुप मोठा बदल ! ‘असं’ झालं तर ‘सिझन’मध्येच ‘धोनी’च्या टीममधील खेळाडू ‘विराट’साठी खेळणार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा 13 वा सीझन सुरु होणार आहे, त्यासाठी आज कोलकत्तामध्ये खेळाडूंवर बोली लागणार आहे. खेळाडूंच्या ऑक्शनआधी बीसीसीआयने टूर्नामेंटमध्ये मोठे बदल केले आहेत. एका वृत्तानुसार 2020 मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये संघ एकमेकांना आपले खेळाडू लोनवर खेळण्यास देतील. याआधी हा नियम फक्त घरेलू खेळाडूंसाठी होता. परंतु आता यात इंटरनॅशनल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना देखील सहभागी करुन घेतले जाणार आहे.

आयपीएलमध्ये मोठा बदल
एका वृत्तानुसार आयपीएलमध्ये जेव्हा अर्धा सीझन होईल तेव्हा संघ भारतीय आणि विदेशी खेळाडू लोनवर आपल्या संघात घेऊ शकतात. म्हणजे जर चेन्नईच्या संघाला एखाद्या खेळाडूला आपल्या संघात ठेवायचे नसेल तर बंगलोर किंवा दुसऱ्या संघात ते हे खेळाडू लोनवर देऊ शकतात. हे अगदी तसेच होईल जसे फुटबॉलच्या संघात होते.

मागील आयपीएलमध्ये खेळाडू लोनवर देण्याची नियम फक्त भारतीय खेळांडूंपूरता मर्यादित होता. यासाठी पाच दिवसांची विंडो देखील ठेवण्यात आली होती. परंतु या नियमात मुंबई इंडियन शिवाय दुसऱ्या कोणत्याही संघाने उत्सुकता दाखवली नाही. परंतु या सीजनमध्ये दुसरे संघ देखील सहभागी होऊ शकतात. कारण आता इंटरनॅशनल खेळाडूंचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.

खेळाडू लोनवर देण्याचा नियम
नियमानुसार असेच खेळाडू लोनवर खेळाडू देता येतील ज्यांनी दोनपेक्षा जास्त सामने खेळले नाहीत. तसेच या खेळाडूंची ऑक्शन पर्सच्या बाहेरून दिली जाईल. यामुळे तसेच तर खेळाडूचा फायदा होणार नाही परंतु ट्रान्सफरबद्दल आयपीएलला माहिती द्यावी लागेल.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/