होय, सुशांतप्रमाणेच ! ‘डिप्रेशन’मुळे विश्वकप विजेत्या क्रिकेटरनं वडिलांनाही गमावलं

पोलिसनामा ऑनलाईन टीम – डिप्रेशन असल्यामुळे अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबाबत चर्चा सुरू झाली. डिप्रेशनमध्ये असलेल्या सुशांतने ज्याप्रमाणे गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला, तसाच काही दिग्गज खेळाडूंनीही केला. त्यापैकीच एक म्हणजे वर्ल्ड कप विजेता क्रिकेटर जॉनी बेअरस्टोचे वडील डेव्हिड बेअरस्टो होते.

जॉनी बेअरस्टोचे वडील डेव्हिड बेअरस्टोही क्रिकेटर होते. इंग्लंडसाठी ते चार टेस्ट मॅच खेळले होते. त्याशिवाय यॉर्कशायरसाठी जवळपास 20 वर्षे खेळले. मात्रा, त्यानंतर ते डिप्रेशनमध्ये होते आणि यातूनच त्यांनी आयुष्य संपवले होते. जॉनी बेयरस्टोने एका मुलाखतीत सांगतिले की, त्याचे वडील डेव्हिड डिप्रेशनमध्ये गेले होते. ते आर्थिक अडचणीत होते. याशिवाय दारू पिऊन गाडी चालवण्याच्या प्रकरणातही ते अडकले होते. यानंतर यॉर्कशायरच्या असोसिएशनशीदेखील त्यांचा वाद सुरू होता. 1990 साली क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर ते रेडिओ कमेंटेटर बनले, मात्र तरीदेखील त्यांना त्रास होत होता. 1997 साली त्यांनी औषधांचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी घरातच गळफास घेतला. ज्यावेळी डेव्हिड यांनी आत्महत्या केली त्यावेळी जॉनी आणि त्याची बहीण लहान होते. जॉनी अवघ्या आठ वर्षांचा होता.

वडिलांच्या मृत्यूमुळे आपल्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला होता. जेव्हा त्यांनी आत्महत्या केली तेव्हा आपण आणि आपली बहीण खूप लहान होती. वडीलांच्या मृत्यूनंतर क्रिकेटर व्हायचे असा निश्चय केल्याचे जॉनीने सांगितले. जॉनी इंग्लंड क्रिकेट टीमचा महत्त्वाचा भाग आहे. इंग्लंडचा ओपनर आणि विकेटकिपर आहे.