पाकिस्तानच्या ‘या’ बड्या क्रिकेटरनं मान्य केली बुकीशी झालेली ‘बातचीत’, 4 दिवसांपर्यंत ‘फोन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुन्हा एकदा क्रिकेट या खेळावर मॅच फिक्सिंगचा डाग लागण्याची शक्यता आहे आणि पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडू या गुंतण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सुपर लीग सुरु होण्यापूर्वी उमर अकमलला पीसीबीने सस्पेंड केले होते, ज्याचे कारण भ्रष्टाचार विरोधी पथकाने आचार संहितेचे उल्लंघन सांगितले आहे. या प्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. पाकिस्तानी मीडियाचा दावा आहे की उमर अकमलने पाकिस्तान सुपर लीग पूर्वी एका बुकीची भेट घेतली होती आणि त्यांनी याची माहिती त्याने पीसीबीला दिली नव्हती.

बुकीला भेटला होते उमर अकमल –
एका वृत्तानुसार उमर अकमलने पीसीबीकडून बॅन आणण्यात आल्यानंतर बुकीशी संपर्क साधला होता आणि त्याला फोन केला होता. 20 फेब्रुवारीला पीसीबीने उमर अकमलचा फोन टॅप केला होता. दावा केला जात आहे की उमर अकमलने बुकीला भेटल्याचे कबूल केले आहे. वरिष्ठ क्रिडा पत्रकार अब्दुल माजिद भट्टी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की पीसीबीकडे उमर अकमल आणि बुकी दरम्यान बातचीत झाल्याची रेकॉर्डींग आहे.

भट्टी यांच्या मते पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून उमर अकमलचा फोन टॅप केला होता. अकमल याला सस्पेंड करण्यात आल्यानंतर त्याचा फोन टॅप करण्यात आल होता त्यानंतर त्याला पीसीबी कमिटीसमोर बोलावण्यात आले. या कमिटीत पीसीबी अध्यक्ष एहसान मनी, पीसीबी चीफ एक्जीक्युटिव्ह वसीम खान, पीएसएल टीम क्वेटा ग्लॅडियेटर्सचे कोच मोइन खान देखील होते. यानंतर पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने उमर अकमलचा फोन जप्त केला आहे आणि त्याला निलंबित करण्यात आले. आता पीसीबीचा तपास होईपर्यंत पाकिस्तानच्या कोणत्याही स्तरावर तो क्रिकेट खेळू शकणार नाही.

वादात अडकला आहे उमर अकमल –
पाकिस्तान सुपर लीग पूर्वी उमर अकमल प्रशिक्षकांशी गैरवागणूक केल्यामुळे त्या प्रकरणात अडकले होते. आरोप आहे की उमर अकमलने फिटनेस टेस्ट दरम्यान प्रशिक्षकांसमोर आपले सर्व कपडे उतरवले, ज्यानंतर त्याला पीसीबी समोर हजर करण्यात आले होते. उमर अकमलचा गैरसमज झाल्याचे सांगत त्याला सोडले होते. उमर अकमलने मागील वर्षी दावा केला होता की 2015 मध्ये वर्ल्ड कप दरम्यान त्याला स्पॉट फिक्सिंगची ऑफर मिळाली होती. त्याच्या या खुलाशानंतर बराच गोंधळ उडाला होता.