अबब ! एकाच T – 20 मॅचमध्ये 7 ‘विश्‍व’विक्रम, ‘हिटमॅन’ रोहितच्या रेकॉर्डशी बरोबरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटच्या खेळात दररोज नवीन विक्रम होत असतात. खेळाडू एकमेकांचे अनेक रेकॉर्ड मोडत असतात. एकाच सामन्यात अनेक विक्रम झाल्याचे आपण पाहतो तसेच ऐकतो. मात्र  झेक प्रजासत्ताक आणि तुर्की या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात तब्बल सात रेकॉर्ड झाले. रोमानिया कप स्पर्धत झालेल्या या सामन्यात दोन्ही संघानी विविध विक्रम आपल्या नावे केले.

या सामन्यात झेक रिपब्लिकनं प्रथम फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या तुर्कीच्या संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात झेक रिपब्लिकने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 4 बाद 278 धावा केल्या. यामध्ये सुदेश विक्रमसेकरा याने शानदार शतक झळकावले. त्याने 36 चेंडूत 8 चौकार आणि 10 षटकार मारले. त्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना तुर्कीच्या संघाला 8.3 षटकांत फक्त 21 धावा करता आल्या. त्यामुळे त्यांना 257 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात झेक प्रजासत्ताकाने सर्वाधिक टी-२० धावांच्या विक्रमाशी बरोबरी करत अफगाणिस्तानच्या 3 बाद 278 धावांची बरोबरी केली.

हे विक्रम घडले या सामन्यात

या सामन्यात मिळवलेला विजय हा धावांच्या दृष्टीने सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात झेक प्रजासत्ताकाने तुर्कीवर 257 धावांनी विजय मिळवला.

एका डावात सर्वाधिक खेळाडू शून्यावर बाद होण्याचा पराक्रम देखील याच सामन्यात घडला. यामध्ये तुर्कीचे 8 खेळाडू शून्यावर बाद झाले.

एका संघाने सर्वात कमी चेंडू खेळण्याचा विक्रम देखील या सामन्यात झाला. तुर्कीच्या संघाने केवळ 51 चेंडूंचा सामना केला.

सर्वाधीक अवांतर धावा देण्याचा विक्रम देखील या सामन्यात झाला . त्यांनी 39 धावा झेक प्रजासत्ताकाच्या फलंदाजांना दिल्या.

सुदेश विक्रमसेकरानं या सामन्यात सर्वाधिक वेगवान टी-20 शतक झळकावण्याचा विक्रम देखील केला आहे. त्याने याबरोबरच रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलर यांच्या वर्गवान शतक करण्याच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली.

आरोग्यविषयक वृत्त 

You might also like