वर्ल्डकपमध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं ‘फाटलं’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत स्वीकाराव्या लागलेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघ ३ ते १४ ऑगस्ट दरम्यान वेस्टइंडीजमध्ये ३ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याचबरोबर अँटिग्वा आणि जमैका मध्ये दोन कसोटी सामने देखील खेळणार आहे. त्याआधी भारतीय संघाविषयी पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा करणारी बातमी समोर आली आहे.

वर्ल्ड कपनंतर भारताच्या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन गट पडल्याची चर्चा रंगली आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री चर्चा न करता निर्णय घेतात, त्यामुळं संघाचे नुकसान होत आहे. त्यामुळं रोहितकडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाईल अशी चर्चा होती. मात्र निवड समितीनं विराटकडेच संघाचे कर्णधार पद दिले आहे.

गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुरावा असल्याचे म्हटले गेले आहे. त्यानंतर रोहित शर्माकडे कर्णधारपद दिले जाणार असल्याच्या देखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत होत्या. मात्र रविवारी झालेल्या बैठकीत निवड समितीने या दौऱ्यात विराट कोहली यालाच कर्णधार म्हणून ठेवले आहे. मात्र या दोघांमधील दरी अजूनही मिटली नसल्याची माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

गल्फ न्यूजनं प्रसिध्द केलेल्या बातमीनुसार, सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवाला विराट कोहलीचे जबाबदार असल्याचे मत रोहितनं व्यक्त केले होते. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी करण्यात रोहितनं केली होती.

वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मनमानी निर्णयामुळे भारताला सेमीफायनलमध्ये मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या दोघांना पदावरून हटवण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात पुढे येत होती. त्याचबरोबर विराट कोहली याचा कारकिर्दीत भारतीय संघाने एकही मोठी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे त्याच्या जागी रोहित शर्मा याची निवड करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात दुरावा निर्माण होण्याचे कारण समोर आले आहे.

शमीशिवाय रविंद्र जडेजालासुद्धा सुरुवातीपासून संधी न दिल्यानं रोहितने प्रश्न उपस्थित केला होता असं गल्फ न्यूजने म्हटलं आहे. सेमीफायनलमध्ये रविंद्र जडेजाने केलेल्या खेळीमुळे भारताचा निसटता पराभव झाला. तसेच जेव्हा जडेजा मैदानात होता तेव्हा रोहित शर्मा त्याला प्रोत्साहन देत असल्याचंही दिसत होतं.

शमी आणि जडेजा आहे कारण

खासगी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रोहित आणि विराट यांच्यात दुरावा निर्माण झाला तो सेमीफायनलमध्ये. मोहम्मद शमी याने उत्तम कामगिरी केलेली असताना देखील संघाबाहेर केल्याने रोहित आणि विराट यांच्यात दुरावा आल्याचे या संस्थेने म्हटले आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा याला देखील जास्त संधी न दिल्याने रोहित शर्माने आपली नाराजी व्यक्त केली होती. सेमीफायनलमध्ये जडेजाने केलेल्या उत्तम फलंदाजीमुळेच भारताला मानहाणिहारक पराभव थोडक्यात टाळता आला. त्याचबरोबर आणखी देखील अनेक मुद्दे देखील या दुरीला असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.

वर्ल्ड कपदरम्यान कोहलीच्या विश्रांतीची चर्चा महिनाभर सुरू होती. मात्र अचानक असं काय झालं की त्यानं विश्रांती न घेता वेस्ट इंडीज दौऱ्यात खेळण्याचा निर्णय घेतला.दरम्यानच्या काळात वर्ल्ड कपमधील भारताच्या पराभवाने कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न विचारले जात होते. अशावेळी कर्णधार म्हणून संघात पुनरागमन करणं कोहलीसमोर आव्हानात्मक ठरलं असतं म्हणूनच त्यानं वेस्ट इंडीज दौऱ्यावर विश्रांती घेतली नाही असं म्हटलं जात आहे.

दरम्यान, कर्णधार विराट हा विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेणार होता. मात्र कर्णधारपदाची टांगती तलवार डोक्यावर असल्याने त्याने या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –