सानिया मिर्झानंतर हरियाणातील ‘ही’ युवती बनणार पाकिस्तानची सून, ‘या’ क्रिकेटरशी होणार विवाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झानंतर आता आणखी एक भारतीय लेक पाकिस्तानची सून बनणार आहे. पुढील महिन्यात २० ऑगस्ट निकाह होणार असून हरियाणाच्या नूंह भागात राहणारी शामिया आरजू पाकिस्तानच्या क्रिकेटरसोबत निकाह करणार आहे. त्याआधी देखील सानिया मिर्झा हिने पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक याच्याशी निकाह केला होता. हरियाणाची हि लेक दुबईमध्ये नोकरीला असून एयर अमीरात मध्ये फ्लाइट इंजीनियर आहे.

पाकिस्तानमधील पंजाबमध्ये जन्मलेल्या हसन अली याचा निकाह हरियाणातील चंदेनी येथील रहिवासी शामिया हिच्याशी दुबईतील ऐटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये होणार आहे.

१७ ऑगस्टला दुबईला जाणार

या लग्नासाठी शामियाच्या परिवारातील सदस्य हे १७ ऑगस्ट रोजी दुबईला रवाना होणार असून या लग्नाविषयी बोलताना शामियाचे वडील म्हणाले कि, मुलीचे लग्न तर करायचे आहे, मग ते भारतात असो किंवा पाकिस्तानमध्ये काय फरक पडतो. फाळणीनंतर आम्ही भारतात राहिलो तर आमचे काही नातेवाईक पाकिस्तानमध्ये राहिले. त्यामुळे आम्हाला काहीही अडचण नाही.

असा ठरला विवाह

शामिया आणि हसन अली यांचे फार जुने कौटुंबिक संबंधित आहेत. शामियाचे वडील लियाकत हे पाकिस्तानचे माजी खासदार सरदार तुफैले आणि त्यांचे वडील हे सख्खे भाऊ होते. त्यामुळे त्यांनी या दोन घरांमध्ये विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता हसन अली आणि शामिया यांचा धुमधडाक्यात निकाह होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like