home page top 1

सेहवाग, गॅरी क्रिर्स्टन आणि रवी शास्त्री यांना पिछाडीवर टाकून ‘हा’ खेळाडू बनणार टीम इंडियाचा ‘कोच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी विश्वचषक २०१९ मध्ये भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने कठोर पाऊले उचलत भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टाफ बदलन्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रशिक्षक स्फाटमधील वेगवेगळ्या पदांवरील भरतीसाठी अर्ज मागवले होते. याची शेवटची तारिख ३० जुलै होती. त्यानंतर रवी शास्त्री हेच पुन्हा कोच होऊ शकतात. असं म्हटलं जात आहे. मात्र या शर्यतीत ग्रेग चॅपल आणि गॅरी क्रिर्स्टन हेही आहेत. तसंच आता एका उत्तम प्रशिक्षकाने अर्ज केला आहे. ज्यावर बीसीसीआयकडून विचार केला जाऊ शकतो.

हा कोच म्हणजे न्यूझीलंडचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक माईक हेसन आहेत. त्यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. हेसन यांनी न्यूझीलंड संघाला मागील सहा वर्षांपासून प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्याच प्रशिक्षणांतर्गत न्यूझीलंडचा संघ २०१५ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरित पोहचला होता. मात्र तेव्हा त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. मागच्या वर्षी माईक यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.

त्यानंतर माईक यांनी आयपीएलमधील किंग्स इलेवन पंजाब संघाला प्रशिक्षण दिले होते. तेव्हा त्यांनी भारतात बराच वेळ घालवला होता. तसंच हेसन यांना स्वतःला भारतासारख्या संघाला प्रशिक्षण देण्याची इच्छा आहे. मात्र हेसन यांची निवड करताना बीसीसीआयला नियमांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. नियमानुसार दोन संघांना प्रशिक्षण देणार असतील तर त्यांची निवड होऊ शकत नाही. सध्या ते पंजाबच्या संघाच्या प्रशिक्षकाचे पद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे यावर विचार करावा लागणार आहे.

दरम्यान, भारतीय संघाच्या कोच बनण्याच्या शर्यतीत महेला जयवर्धने, टॉम मूडी, वीरेंद्र सेहवाग आणि रवी शास्त्री यांचा समावेश आहे. यातील कोणाची निवड केली जाऊ शकते. त्यामुळे माजी कर्णधार कपिल देव यांची निवड समिती कोणाला निवडते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like