कॅप्टन कोहलीनं ‘स्टम्प’वरच काढला ‘विराट’ राग (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात गडी राखून मात केली. नाणेफेक जिंकून भारताने दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले असता कर्णधार क्विंटन डी कॉक याच्या अर्धशतकाच्या आणि टेम्बा बवुमा याच्या शानदार 49 धावांच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 149 धावा केल्या.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला सात विकेट्सने सहज मात दिली. भारताच्या वतीने कर्णधार विराट कोहली याने शानदार 72 धावांची अर्धशतकी खेळी. कोहलीच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 19 षटकांतच आफ्रिकेचा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयाबरोबरच भारतीय संघाने या सामन्यात अनेक विक्रमांची देखील नोंद केली. या सामन्यातील अनेक विक्रमांबरोबरच सध्या विराट कोहलीचा कालच्या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली त्याचा राग स्टम्पवर काढताना दिसून येत आहे.  दक्षिण आफ्रिकेच्या डावात फलंदाजी सुरु असताना कर्णधार डी कॉक फलंदाजी करत होता. यावेळी श्रेयस अय्यर याने फेकलेला चेंडू विराट कोहली याच्यापासून दूर गेल्यानंतर राग आलेल्या कोहली याने रागात थेट स्टम्प उखडला. त्यामुळे त्याच्या प्रचंड रागाचे देखील या व्हिडिओमध्ये दर्शन झाले. त्याचबरोबर या सामन्यात अनेक विश्वविक्रम देखील झाले. कर्णधार कोहली याने रोहित शर्मा याला मागे टाकत टी-20 सामन्यांत सर्वाधिक धावा करण्याचा देखील कारनामा केला.

दरम्यान, कोहलीने या सामन्यात 72 धावा करताच रोहित शर्मा याला मागे टाकले. विराट कोहलीच्या आता या प्रकारात 2 हजार 441 धावा झाल्या आहेत. तर रोहित शर्मा याच्या 2 हजार 434 धावा झाल्या आहेत. तसेच विराटने रोहितपेक्षा कमी डाव खेळून या धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहित शर्मा याच्यापेक्षा 26 सामने कमी खेळून कोहलीने हा रेकॉर्ड केला आहे.

visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like