विराट कोहली T-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणार ? भारतीय कॅप्टननं सुनावला त्याचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या क्रिकेट विश्वात क्रिकेटर्स कामाच्या ओझ्याखाली दिसत आहेत. एवढेच नाही तर भारतीय कर्णधार विराट कोहली देखील त्याच्यावरील कार्यभारासंबंधी बोलला आहे. कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन असे कर्णधार आहेत जे सर्व क्रिकेट फॉर्मेटमध्ये संघाची कमान संभाळतात. त्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढत आहे. आयपीएलमुळे त्यांना आरामासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. आपले करिअर बराच काळ चालावे म्हणून अनेक क्रिकेटर आपल्या वर्कलोड व्यवस्थापनासाठी विविध पावले उचलत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा सलामवीर डेविड वॉर्नरने हे पहिल्यांदाच केले आहे. तो 2021 टी-20 वर्ल्ड कपनंतर कदाचित या फॉर्मेटला राम राम ठोकू शकतो. भारतीय कर्णधारावर वर्कलोड वाढत आहे. त्यामुळे त्याने एक फॉर्मेट सोडण्याबाबत आपला निर्णय सुनावला आहे.

येणाऱ्या आवाहनावर लक्ष –
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान वेलिंग्टनमध्ये शुक्रवारी पहिला कसोटी सामना पार पडला. सामन्यापूर्वी बुधवारी प्रेस कॉन्फरसमध्ये कोहलीला विचारण्यात आले की तो 2021 च्या टी-20 वर्ल्डकप नंतर कोणता तरी एक फॉर्मेट सोडण्याच्या विचारात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना विराट म्हणाला की तो स्वत:ला या तीन वर्षांसाठी तयार करत आहे. त्याच्या बोलण्यावरुन तो एखाद्या फॉर्मेट सोडू शकतो. भारतीय कर्णधाराने सांगितले की कोणत्याही एका फॉर्मेटमधून संन्यास घेण्याचा विचार करण्याऐवजी स्वत:ला तीन वर्षांसाठी तयार करण्यावर लक्ष देत आहे.

विराट कोहलीने याचा स्वीकार केला की थकवा आणि वर्कलोडचे व्यवस्थापन करण्याप्रकरणी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. अद्याप त्याने यावर काहीही बोलले नाही. कोहली म्हणाला की असे काहीही नाही की ते तुमच्यापासून लपवले जात आहे. तो म्हणाला की तो जवळपास 8 वर्ष वर्षातील 300 दिवस खेळतो. ज्यात प्रवास आणि सराव सत्र सहभागी आहे. विराटने म्हणाला की, जेव्हा तो 34 किंवा 35 चा होईल आणि जेव्हा शरीरावरील जास्त ओझे संभाळू शकणार नाही. तेव्हा ते वेगळी चर्चा करतील. परंतु पुढील दोन तीन वर्ष त्याला तीनही फॉर्मेटमुळे कोणतीही समस्या नाही.