भारताच्या पराभवाचा पाकिस्तानी मंत्र्याला झाला आनंद ; ट्विटरवरून केला धोनीचा अपमान

मुंबई : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमधील सेमीफायनल सामन्यात भारताला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. या वेळेस वर्ल्डकप भारतच जिंकणार असे सर्व चाहत्यांना वाटत असतानाच भारताचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला. या पराभवामुळे भारतीय संघासोबतच भारतीय क्रिकेट चाहत्यांना खूप दुःख झाले. मात्र भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानमधील काही लोकांना चांगलाच आनंद झाल्याच दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रीमंडळातील नेते फवाद अहमद चौधरी यांनी ‘धोनीच्या नशिबात अशाप्रकारे अपमान होऊन बाहेर पडणेच होते’, असे वादग्रस्त विधान केले आहे.

पाकिस्तान सरकारमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री असलेल्या फवाद चौधरी यांनी न्यूझीलंडने भारताचा पराभव केल्यानंतर एक ट्विट केले. ‘पाकिस्तानी लोकांचे नवे प्रेम म्हणजे न्यूझीलंड’ असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते. न्यूझीलंडने भारताचा पराभव करुन त्यांना स्पर्धेबाहेर काढण्याने फवाद चौधरी यांनी आनंदाच्या भरात हे ट्विट केले. या पाकिस्तानच्या मंत्र्याला न्यूझीलंडचे स्पेलिंग देखील नीट लिहिता आलेले नाही. यावरून देखील भारतीयांनी फवाद चौधरी यांना ट्रोल केले आहे.

फवाद चौधरी यांच्या या जळक्या ट्विटचा भारतीय ट्विटर युजर्सनी चांगलाच समाचार घेतला. मात्र दुसरीकडे पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्या वक्तव्याला समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया ट्विट केल्या. फवाद चौधरी यांनी आपल्या बालिशपणाचे प्रदर्शन करत त्यांच्या फॉलोअर्सने केलेल्या भारत तसेच धोनी विरोधी ट्विटही रिट्विट करत त्या ट्विटला सहमती दर्शवली आहे. ‘फिक्सींग आणि पक्षपात करुन सज्जनांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटला डाग लावणाऱ्या धोनीला अशाच प्रकारे अपमानजनक निरोप मिळायला हवा,’ हे ट्विट फवाद चौधरी यांनी रिट्वीट केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

 

You might also like