भारताच्या आणखी एका माजी क्रिकेटपटूची सिनेमात ‘एन्ट्री’, सुपरस्टारसोबत दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या भारतीय संघाबाहेर असून लवकरच तो सिनेमाच्या माध्यमातून दुसरी कारकीर्द सुरु करणार आहे. पठाण तमिळ सुपरस्टार विक्रम याच्याबरोबर ‘विक्रम 58’ या सिनेमात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय गणमुथु आणि निर्मिती ललित कुमार यांचा सेवन स्‍क्रीन स्‍टूडिओ करत आहे. या सिनेमाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून भारताबरोबरच विदेशात देखील याचे चित्रीकरण केले जाणार आहे. या सिनेमात इरफान पठाण पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसून येणार असून एआर रहमान हे सिनेमाला संगीत देणार आहेत.

उत्साहात आहे इरफान –
सिनेमाचे दिग्दर्शक अजय यांनी यापुर्वी डीमोंटे कॉलोनी आणि इमैक्‍का नोडिगल यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. इरफान पठाण आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून खेळला आहे, त्यामुळे तामिळनाडूमध्ये देखील त्याचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. या सिनेमाविषयी बोलताना तो म्हणाला कि, मी खूप खुश असून माझ्यासाठी हे एक नवीन आव्हान आहे. या सिनेमाविषयी इरफान याने ट्विट करून माहिती दिली. सिनेमाचे दिग्दर्शक गणमुथु यांनी ट्विट केले कि, इरफान पठाण सर स्वागत आहे तुमचे, प्रेक्षकांना तुमच्या या दुसऱ्या रूपाचे वेध लागले आहेत. त्याचबरोबर त्याने इरफान पठाणबरोबर आपला एक फोटो देखील ट्विट केला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी