Video : ‘या’ भारतीय क्रिकेटपटूने समुद्रकिनारी ‘KISS’ करत केला गर्लफ्रेंडला प्रपोज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद पदार्पणातील त्रिशतक झळकवणारा भारताचा गुणी खेळाडू करुण नायरने आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणखी एक यश मिळवलं आहे. नुकतंच त्याने गर्लफ्रेण्डला प्रपोज केलं असून तिने ‘हो’ म्हटल्याच त्याने आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट च्या माध्यमातून सांगितलं. करुण लवकरच सनया तनकारीवाला या आपल्या गर्लफ्रेण्ड सोबत लग्न करणार आहे.

गुडघ्यावर बसून अत्यंत रोमँटिक पद्धतीने करुणने आपल्या गर्लफ्रेण्डला लग्नाची मागणी घातली. तिनेही लगेचच त्याला होकार देत त्याच्या गालावर प्रेमाने किस करत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर सुट्टीसाठी गेल्यावर करुणने हि संधी साधली. यानंतर इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यावेळी त्याने फोटोसोबत ‘She said YES’ असे कॅप्शन दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार करुण आणि सनया गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असून ते लवकरच लग्न करणार आहेत. त्यांच्या रोमँटिक क्षणांचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर अनेकवेळा शेअर केले आहेत.

करुणची खेळातील कामगिरी :
करुणने कसोटी क्रिकेटबरोबरच आयपीएल मध्येही चमकदार कामगिरी बजावली आहे. २७ वर्षीय करुणच्या रणजी पदार्पणातच त्याच्या कर्नाटक संघाने २०१३-१४ चा करंडक जिंकला होता. रणजीच्या अंतिम फेरीत त्रिशतक झळकवणारा तो एकमेव फलंदाज आहे. कर्नाटकने २०१४-१५ मध्ये पुन्हा रणजी कप जिंकला, तेव्हा करुणने दहा सामन्यांमध्ये ७०९ धावा ठोकत महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये करुणने २०१६ साली झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं. तर त्याच वर्षी मोहालीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या पहिल्याच सामन्यात त्याने त्रिशतकी खेळी केली. कसोटीमध्ये त्रिशतक ठोकणारा वीरेंद्र सेहवागनंतरचा तो दुसरा भारतीय फलंदाज आहे.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी