Cricketer Shubman Gill | “सारा दा सारा सच बोल दिया”, क्रिकेटर शुभमन गिलने अभिनेत्री सारा सोबतच्या नात्याचा केला मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्रींपैकी सारा अली खान (Actress Sara Ali Khan) ही एक आहे. दरम्यान अभिनेत्री सारा अली खान आजकाल तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. या चर्चेच कारण म्हणजे क्रिकेटर शुभमन गिल (Cricketer Shubman Gill). मागील काही दिवसांपासुन अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल (Cricketer Shubman Gill Dating Actress Sara Ali Khan) एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. तसेच या दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते. पण आता शुबमन गिलने (Cricketer Shubman Gill) या अफेअरवर मौन तोडत नात्याची सत्यता सांगितली.

 

काय म्हणाला शुभमन गिल?
खरं तर, प्रीती आणि नीती सिमोजच्या लोकप्रिय असलेल्या पंजाबी चॅट शो (Punjabi Chat Show) ‘दिल दिया गल्ला’ (Dil Diya Galla) मध्ये क्रिकेटर शुभमन गिल पाहुणा म्हणून आला होता. दरम्यान या कार्यक्रमादरम्यान क्रिकेटर शुभमन गिल बरीच चर्चा झाली.या चर्चेवेळी ‘दिल दिया गल्ला’ शोची होस्ट सोनम बाजवाने शुभमन गिलला तुमच्या मते सर्वात योग्य अभिनेत्री कोण आहे? हा प्रश्न विचारला होता.मग काय या प्रश्नाचे उत्तर देताना शुभमन गिलने लगेच सारा अली खानचे नाव घेतले. तसेच पुढे शुमनन गिलला तु सारा अली खानला डेट करतोय का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना शुबमन लाजत हसत म्हणाला की, “सारा दा सारा सच बोल दिया (Sara Da Sara Sach Bol Diya)..कदाचित हो कदाचित नाही.”

‘या’ ठिकाणी झाले एकत्र स्पॉट
खरतर अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.
त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले आहे.
बऱ्याचवेळा या दोघांना त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते.
पण दोघेही हे नात लपवत होते. दरम्यान नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सारा अली खान फ्लाइटमध्ये काही चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे.
तर साराच्या शेजारच्या सीटवर शुभमन दिसत होता.
इथेच नाही तर काही दिवसांपूर्वी तो मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना दिसला होता.
तसेच याशिवाय तो दिल्लीतील एका हॉटेलबाहेरही स्पॉट झाला होता.

 

Web Title :- Cricketer Shubman Gill | shubman gill confess to dating sara ali khan on talk show dil diyan gallan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Naresh Mhaske | श्रीनगर परिसरात झालेल्या लाठीमाराची चौकशी करण्यासाठी शिंदे गटाकडून पोलीस आयुक्तांना निवेदन

Pune Accident | कॅमेरात कैद झाल्या ठिणग्या; पुणे-अहमदनगर महामार्गावर एक भयानक अपघात

Jitendra Awhad | जामीन मिळताच आव्हाडांची प्रतिक्रिया; “…मला संपवण्यासाठी ठरवून”