पोलिसांच्या फिक्सपाॅईंट समोरून दानपेटी लंपास 

औरंगाबाद : पोलिसासनामा ऑनलाईन  – औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत संस्थान मधील गणपतीची दानपेटी पहाटे ५ च्या सुमास दोन सराहीत चोरट्यांनी लंपास केली आहे. ह्या चोरट्यांनी पोलिसांच्या रिकाम्या फिक्सपाॅईंट समोरून हि दानपेटी उचलून नेली.  त्यानंतर हे चोर एका रिक्षा मधून फरार झाले. या प्रकारणी सिटी पोलीस ठाण्यामध्ये चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांच्या गुन्हेशाखेने तत्परतेने CCTV फुटेजच्या माध्यमातून या गुन्ह्यात वापरण्यात येणारी रिक्षा जप्त केली आहे. पण चोरटे अद्याप दानपेटीसहित फरार आहेत.

हि संपूर्ण घटना सकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आली. मंदिराचे पुजारी ओंकार दिक्षीत ज्या वेळी पूजा करण्यासाठी गेले, तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. चोरीचा हा सर्व प्रकार मंदिरातील CCTV फुटेज मध्ये कैद झाला आहे. मंदिरामधील फिक्स पाॅईंटवर असलेला कर्मचारी रोज पाहटे ४ च्या सुमारास निघून जातो. या वर त्या चोरटयांनी लक्ष ठेवून हि दानपेटी लंपास केली आहे.

गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी चोरट्यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पोलिसांना आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. तरी देखील ते आरोपी ताब्यात येईपर्यंत पोलीस आपरोपींविषयी माध्यमांसमोर कोणतीही माहिती देणार नसल्याचे, पोलिस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.