Crime in Mumbai | खाजगी रुग्णालयात 21 वर्षीय नर्ससोबत घृणास्पद कृत्य, आरोपी डॉक्टर फरार

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन – नालासोपाऱ्यातील (Nalasopara) एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) डॉक्टरने नर्सचा विनयभंग (Doctor Molest Nurse) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालयात खळबळ उडाली आहे. आरोपी डॉक्टरने परिचारिका म्हणून काम करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला आपल्या वासनेची शिकार बनवलं. या प्रकरणी पीडित तरुणीने तुलिंज पोलीस ठाण्यात (Tulinj Police Station) डॉक्टर विरोधात फिर्याद दिली आहे. Crime in Mumbai doctor molest 21 years old nurse in private hospital in nalasopara accused doctor absconded rm

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पीडित तरुणीने डॉक्टरविरोधात फिर्याद दिल्यानंतर तुलिंज पोलीस ठाण्यात डॉक्टर विरोधात विनयभंगासह धमकी देण्याच्या कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच डॉक्टरने पलायन केले आहे.
पोलिस त्याचा शोध घेत आहे. डॉ. सुशील मिश्रा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
हा प्रकार आरती हॉस्पिटलमध्ये घडला आहे.

आरोपी डॉक्टर मिश्रा हा नालासोपारा पूर्व भागातील संतोष भुवन युपी नाका परिसरातील आरती रुग्णालयात कार्यरत आहे.
या ठिकाणी तो पार्टनरशिप मध्ये असून रुग्णालयाच्या मॅनेजमेंटचं काम पाहतो.
याच रुग्णालयात काम करणाऱ्या 21 वर्षीय पीडित नर्स तरुणीचा त्याने विनयभंग केला आहे.
आरोपी डॉक्टरने तरुणीचा विनयभंग केल्यानंतर याची वाच्यता कुठेही न करण्याची धमकी दिली,
असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

दुसऱ्या घटनेत डॉक्टरेचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे
दुसऱ्या एका घटनेत, नागपूरमधील (Nagpur) सद्भावनानगर येथील एका रुग्णालयात उचारासाठी आलेल्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत (Minor Girl) डॉक्टरने अश्लील चाळे केले.
डॉक्टरने पीडितेला सलाईन लावल्यानंतर काही वेळानं तिच्याजवळ कोणी नसल्याचे पाहून अश्लिल चाळे केले.
याप्रकरणी 35 वर्षीय डॉक्टर विरोधात नंदनवन पोलीस ठाण्यात (Nandanvan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Crime in Mumbai doctor molest 21 years old nurse in private hospital in nalasopara accused doctor absconded rm

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Vinayak Raut | ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’

Social and Political Agitation Cases | सामाजिक, राजकीय आंदोलनातील डिसेंबर 2019 पुर्वेचे खटले मागे घेण्याचा सरकारचा निर्णय, समिती स्थापन

MP Vinayak Raut | ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’