Crime News | मिरवणुकीच्या काही तास आधी नवरदेवाने केली आत्महत्या, ‘या’ गोष्टीचा होता राग

बांसवाडा : वृत्तसंस्था – Crime News | राजस्थानमधील (Rajasthan) बांसवाडा (Banswada) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या लग्नात डीजे वाजवू दिला नसल्याने आत्महत्या केली आहे. लग्नाच्या काही तास आधी तरुणाने गळफास लावून घेतला (Groom Commits Suicide) असल्याचे सूत्रानुसार समजले आहे. मृत तरुणाच्या घरी नोत्राचा कार्यक्रम सुरू असताना तो रात्रभर कुटुंबासोबत होता. सकाळी हा तरुण घरातून बाहेर पडला मात्र पुन्हा परतला नाही. लग्नघरातून वर अचानक गायब झाल्याने संपूर्ण घरात एकच खळबळ उडाली होती सर्वांनी वराचा शोध सुरू केला असता कुटुंबीयांना त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेला आढळून आला. (Crime News)

 

झाडाला लटकलेला मृतदेह आढळला.
ह्या घटनेमुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणाच्या आत्महत्येचे कारण लग्नात डीजे वाजवण्यास विरोध केल्याचे बोले जात आहे. मात्र, पोलिसांनी काही गोष्टींची माहिती दिली नाही. हे संपूर्ण प्रकरण अंबापुरा पोलीस ठाण्याच्या (Ambapura Police Station) हद्दीतील दावडीमल भागातील असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी कुशलगढच्या (kushalgadh) सारेल गावात 21 वर्षीय (21 year) लालसिंग (lalsing)उर्फ विनोदची मिरवणूक काढण्यात येणार होती. तत्पूर्वी लग्नात झालेला खर्च भागवण्यासाठी नोटरेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात तरुण रात्रभर कुटुंबासोबत होता. यानंतर सकाळी घरातून बाहेर पडल्यावर तो परत आलाच नाही. त्यानंतर लाल सिंह यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खाली काढला. (Crime News)

पोस्टमार्टमनंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेबाबत एएसआय (ASI) रमेशचंद्र मीणा (rameshchandra mina) यांनी सांगितले की, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डीजे न वाजवल्याचे हे कारण पोलिसांनी सांगितले आहे. एएसआय मीणाने सांगितले कि लाल सिंह कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला एक मोठी लग्न झालेली बहीण आहे. वडिलांचेही दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. लाल सिंह यांचा विवाह सामाजिक रितीरिवाजानुसार होत होता.
त्याच्या नाराजीबद्दलही कुटुंबीय माहिती देऊ शकत नाहीत. नोत्रा कार्यक्रमादरम्यान लाल सिंह यांनी डोक्याला स्कार्फ बांधला होता.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्कार्फ फाडून एक भाग झाडाला बांधला होता , तर दुसरा भाग गळ्यात बांधला होता.
त्याने थंडीमुळे एक शाल अंगावर घेतली होती तेही झाडाच्या फांदीवर पडलेली आढळली.
घरातील वंशाच्या मृत्यूने कुटुंबीयांना खूप जोरदार धक्का बसला आहे. या आत्महत्येमुळे संपूर्ण गावामध्ये शोकाकुल वातावरण आहे.

 

 

Web Title :- Crime News | banswara groom commits suicide before baraat leaving for sasural when dg not play in wedding banswara

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | तुकाराम सुपेंवरील कारवाईवरुन अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘अधिकाऱ्यांकडे नोटाच मिळायला लागतात’

Nitin Raut | नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा दणका, ‘या’ विभागाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं!

Pune Crime | मुंबई-बंगळूरू महामार्गावर चांदणी चौकात भीषण अपघात; 2 ठार, 3 गंभीर जखमी