Pune Crime | मुंबई-बंगळूरू महामार्गावर चांदणी चौकात भीषण अपघात; 2 ठार, 3 गंभीर जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुंबई-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली (Pune Crime) आहे. भरधाव वाहनाने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली आहे. या झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत. हा अपघात मुंबई-बेंगळुरू महामार्गावर (Mumbai-Bangalore Highway) चांदणी चौक (chandani chowk pune) येथे शुक्रवारी रोजी झाला आहे.

रुग्णवाहिका चालक महेश विश्वनाथ सरवडे (Mahesh Vishwanath Sarvade) (वय 44, रा. कोपर खैरणे, नवी मुंबई) आणि सीताबाई हरी चव्हाण (Sitabai Hari Chavan) (वय 54, रा. तळोजा), अशी मृत्यू (Died) झालेल्यांची नावे आहेत. मनोहर हरी चव्हाण (Manohar Hari Chavan) (वय 26), राजा हरी चव्हाण (वय 35), शिवाजी मारुती खडतरे (Shivaji Maruti Khadtare) (वय 30) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गोपाळ भीमला चव्हाण (Gopal Bhimla Chavan) (वय 45, रा. तळोजा एमआयडीसी, पनवेल) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यानंतर आयशर गाडी चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत माहिती अशी, चांदणी चौकात एक रुग्णवाहिका टायर बदलण्यासाठी थांबली होती. रुग्णवाहिकेचा चालक आणि क्लिनर टायर बदलत होते. त्या दरम्यान भरधाव वेगात आलेल्या आयशर गाडीने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातामध्ये (Accident) रुग्णवाहिकेचा चालक आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णवाहिकेचा क्लिनर आणि अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर आयशर गाडी चालक पळून गेला आहे. अशी माहिती पोलिसांनी (Hinjewadi Police Station) दिली आहे.

Web Title :- Pune Crime | accident on mumbai bangalore highway two killed three seriously injured at chandni chowk pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ, जाणून घ्या आकडेवारी

PM Kisan Scheme | खुशखबर ! नवीन वर्षात ‘या’ शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येऊ शकतात 4000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

Pune Crime | हातात कोयता घेऊन परिसरात दहशत पसरवणारा ‘भाई’ गजाआड, वाकड पोलिसांची कारवाई

Omicron Restrictions Pune | पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू ! ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर निर्बंध; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Lockdown | ‘राज्यात 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागल्यास Lockdown – राजेश टोपे