Nitin Raut | नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा दणका, ‘या’ विभागाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते (Congress Leader) आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना काँग्रेस हायकमांडनं दणका दिला आहे. नितीन राऊत (Nitin Raut) यांची अनुसुचित जाती विभागाच्या (SC Department) अध्यक्षपदावरुन गच्छंती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता माजी आमदार राजेश लिलोठिया (Former MLA Rajesh Lilothia) यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजेश लिलोठिया यांची एससी विभागाच्या अध्याक्षपदासाठी नियुक्ती केली असल्याचे काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल (K.C. Venugopal) यांनी सांगितलं.

 

काँग्रेसनं आज अधिकृत पत्रक काढून एससी विभागाच्या नव्या अध्यक्षांची घोषणा केली आहे. राजेश लिलोठिया यांची अनुसूचित जाती (एससी) विभागाच्या अध्यक्षपदी, तर के. राजू (K. Raju) यांची काँग्रेसच्या अनुसुचित जाती/ओबीसी/अल्पसंख्याक आणि अखिल भारतीय आदिवासी विभागाच्या कामकाजाची देखरेख करण्यासाठी समन्वयक पदावर नियुक्ती केली आहे.

 

दोन्ही नियुक्त्या तात्काळ स्वरुपात लागू होणार असल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. तसेच काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत ((Nitin Raut) ) यांनी आजवर एससी विभागासाठी दिलेल्या योगदानाबद्दल काँग्रेस पक्षाकडून त्यांचे आभार देखील मानण्यात आले आहेत.

 

Web Title :- Nitin Raut | dr nitin raut has been removed national chairman congress sc department rajesh lilothia replaced

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ, जाणून घ्या आकडेवारी

PM Kisan Scheme | खुशखबर ! नवीन वर्षात ‘या’ शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येऊ शकतात 4000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

MahaTET Exam Scam | TET घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेनंतर ‘या’ आरोपीकडून 24 किलो चांदी 2 किलो सोनं, हिरे जप्त