Ajit Pawar | तुकाराम सुपेंवरील कारवाईवरुन अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘अधिकाऱ्यांकडे नोटाच मिळायला लागतात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | म्हाडा प्रश्नपत्रिका पेपर फुटीचा (Mhada Scam Sase) तपास करताना TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा निकालात फेरफार झाल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांना (Pune Cyber Police) मिळाली होती. तेव्हापासून पोलिसांच्या तपासात अनेक नवनवी माहिती समोर येत आहे. टीईटी गैरव्यवहार प्रकरणी (MahaTET Exam Scam) राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) व तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांना अटक केली. यानंतर सुपे यांच्याकडून आतापर्यंत सुमारे 3 कोटी 93 लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहे. यावरुन आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली.

 

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या भव्य इमारतीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘आपले काही अधिकारी जबाबदारी दिल्यानंतर अतिशय चुकीचे वागतात. त्यामुळे लोकांनाही कळत नाही की यांनी काय हे काय चालवले आहे. अधिकाऱ्यांकडे नोटाच मिळायला लागतात. आपल्याकडे ताजे उदाहरण आहे. कोण कुठले सुपे काही कळायला मार्ग नाही. सभागृहामध्ये आम्ही कालच सांगितले आहे, या प्रकरणात कोणीही असले अथवा त्याचे धागेदोर कितीही वरपर्यंत असले तरी जे कोणी दोषी असतील त्यांना मुलांच्या भवितव्यासोबत खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. (TET Exam Scam Case)

पुढे अजित पवार म्हणाले, ‘पुणे पोलीस आयुक्तांचा (Pune Police Commissioner) तपास योग्य दिशेने सुरु आहे.
ते याच्या मुळापर्यंत जातील याची आम्हाला खात्री आहे. हे प्रकरण समाजाला अडचणीत आणणारे आणि घातक आहे.
असे पुन्हा घडू नये आणि यात राजकारण आणू नये. CBI ला भरपूर कामं आहेत. आपले पोलीस सक्षमपणे काम करताहेत.
याआधी ही आपण सीबीआयला खूप प्रकरणे सोपवली. सुशांत सिंह प्रकरणात काय झालं, शेवटी आत्महत्या आहे हेच पुढं आले आहे.
उगाच आभास निर्माण करू नये. आपली पोलीस यंत्रणा कमी पडली तर दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची की नाही हे पाहू,’ असं ते म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar reaction to tukaram supe action in tet scam MahaTET Exam Scam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nitin Raut | नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा दणका, ‘या’ विभागाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं!

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ, जाणून घ्या आकडेवारी

PM Kisan Scheme | खुशखबर ! नवीन वर्षात ‘या’ शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येऊ शकतात 4000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?