भाड्याने घेतलेले दुकान विक्रीच्या बहाण्याने त्या दोघा भावांनी घातला ३८ लाखांचा गंडा

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाड्याने घेतलेले दुकान स्वत: विकत घेतल्याची बतावणी करून दोन भावांनी ते विक्री करण्याच्या बहाण्याने एकाकडून १० लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातला. अशाच प्रकारे फ्लॅट विक्री करण्याच्या बहाण्याने आणखी काही लोकांकडून पैसे घेऊन तब्बल ३८ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार कोंढवा येथे उघडकिस आला आहे.

गणेश एकनाथ गायकवाड (३४, कोंढवा) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार तसलीम रफीउद्दीन सय्यद व मुजाहिद रफीउद्दीन सय्यद अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत.

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गायकवाड व सय्यद बंधून हे एकमेकांना ओळखतात. त्यानंतर त्याने कोंढव्यातील शिवनेरी नगर येथील माहि अपार्टमेंटमध्ये त्यांनी दुकान विकत घेतले असल्याचे सांगून ते विक्री करावयाचे आहे असे सांगितले. त्यांच्याकडून त्यापोटी १० लाख ७० हजार रुपये रोख व चेकद्वारे घेतले. मात्र त्यांना ते दुकान विकत दिले नाही. त्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर त्यांनी ते दुकानाचा मालक दुसराच कुणीतरी असून सय्यद याने ते भाडेतत्वावर घेतलेले आहे.

त्यासोबतच द्वारकाबाई गोपाल शर्मा, आशा नवलेश, बापू आणवा राऊत यांना सोसायटीतील फ्लॅट आपल्याच मालकीचे आहेत ते विक्री करायचे आहेत. असे सांगून त्यांच्याकडूनही पैसे घेतले. त्यासोबतच त्यांना फ्लॅट न देता त्यांची एकूण ३८ लाखांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कर्चे करत आहेत.