Crime News | तिथं जाण्यासाठी खर्च केले 75 लाख ! एकाच कुटुंबातील 4 मृतदेह संशयास्पद सापडले; सर्वत्र खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Crime News | अमेरिका (America) आणि कॅनडाच्या (Canada) सीमेजवळ झालेल्या गुजराती कुटुंबाच्या (Gujarati Family) संशयास्पद मृत्यूने (Died) सर्वत्र खळबळ (Crime News) उडाली आहे. दरम्यान या मृत्युबाबत कॅनडा पोलिसांना (Canadian Police) काही पुरावे सापडले आहेत. यानूसार त्यांना शोध लावणं आव्हानात्मक झालं आहे. खरंतर या कुटुंबीयाने अमेरिकेला पोहचण्यासाठी 75 लाख का खर्च केले ? असा सवाल पोलिसांनी उपस्थित केला आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करावी का लागली ? याबाबत पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान मानवी तस्काराचं हे प्रकरण वाटत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

 

कॅनडा-अमेरिकेच्या सीमेवर 4 लोकांचा मृतदेह गुरुवारी सापडला. या मृतदेहांमध्ये 2 वयस्क आणि 2 मुलं होती. सापडलेले मृतदेह एकाच कुटुंबाचे असून ते मूळचे गुजरातमधील (Gujarat) असल्याची माहिती आहे. या चौघांचा मृत्यू (Died) कडाक्याच्या थंडीमुळे झाल्याचा अंदाज आहे. भारतीय दुतावासाने हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. सुरुवातीच्या चौकशीत मानवी तस्कराचा संशयही पोलिसांना वाटत आहे. अशी माहिती पोलिसांकडून येत आहे. (Crime News)

दरम्यान, मानवी तस्कराने या 4 ही लोकांना याठिकाणी आणले. मात्र भीषण थंडी असल्याने त्यांचा मृत्यू झाला. असं पोलिसांच्या अंदाजानूसार समजते. 19 जानेवारीला यूएस कॅनडाच्या सीमेजवळ अमेरिकन अधिकाऱ्यांना अशा लोकांचा एक समूह सापडला जो बेकायदेशीरपणे कुठलीही कागदपत्रे नसताना अमेरिकेच्या सीमेत प्रवेश करत होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर कॅनडा पोलिसांनी 4 जणांचा शोध सुरु केला. तेव्हा सीमेजवळ या चौघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. अशी माहिती सुत्राकडून मिळते. दरम्यान, गुजराती कुटुंब टूरिस्ट व्हिसाच्या आधारे कॅनडा पोहचले तर सीमा पार करुन अमेरिकेला का जायचं होतं ? असाही सवाल उपस्थित केला जातोय.

 

Web Title :- Crime News | four bodies of the gujrati family found suspicious at us border 75 lakhs spent to go to america

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा