TET Exam Scam | पुणे सायबर पोलिसांकडून IAS अधिकारी सुशील खोडवेकरला अटक; शिक्षक भरती घोटाळ्यातील सहभाग समोर आल्यानं कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam) नवनवीन खुलासे होत आहेत. पुणे सायबर पोलिसांनी याप्रकरणात मोठी कारवाई केली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam) पुणे पोलिसांच्या सायबर (Pune Cyber Police) विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर (IAS officer Sushil Khodvekar) यांना अटक (Arrest) केली आहे. प्रशासकीय सेवेतील एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुशील खोडवेकर यांना अटक केल्याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस. हाके (Senior Inspector of Police D.S. Hake) यांनी दिली आहे.

 

पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेल्या आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर हे उपसचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, (Deputy Secretary, Department of School Education and Sports) मुंबई येथे कार्यरत आहेत. पुणे सायबर पोलिसांनी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam) आजपर्य़ंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी तुकाराम सुपे (Tukaram Supe), अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) व प्रितीश देशमुख (Pritish Deshmukh) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam) अटक करण्यात आलेल्या आरोपींनी 2019-20 परीक्षेच्या निकालात तब्बल 7880 अपात्र परीक्षार्थींचे गुण वाढवून त्यांना पात्र केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती कालच पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी दिली होती.
या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल यांची पडताळणी सायबर पोलिसांनी केली.
2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 705 परीक्षार्थींना पात्र करण्यात आले आहे.
प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल 7 हजार 880 परीक्षार्थी हे अपात्र असल्याचे समोर आले आहे.

 

सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून (Thane News) पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांना आज (शनिवार) दुपारी शिवाजीनगर येथील न्यायालयात (Shivaji Nagar Court, Pune) हजर करण्यात येणार आहे.

 

 

Web Title :-  TET Exam Scam | IAS officer Sushil Khodvekar arrested by Pune Cyber ​​Police; Action against teacher recruitment (TET) scam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | छेडछाडीची तक्रार केल्याचा राग ! 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या डोक्यात घातला हातोडा, परिसरात खळबळ

 

Crime News | PUBG चा टास्क पूर्ण करण्यासाठी आईसह भाऊ बहिणींवर तरुणाने झाडल्या गोळ्या

 

Anti Corruption Bureau (ACB) Nashik | प्रजासत्ताक दिनी चांगली परेड केली म्हणून ‘सत्कार’, दुसऱ्या दिवशी 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात