Crime News | श्रीगोंद्यात 30 वर्षीय महिलेचा साडीने गळा आवळून डोक्यात वार करून निघृण खून, प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन टीम – Crime News | श्रीगोंदा (shrigonda) तालुक्यातील सुरेगाव येथील एका शेतातील बांधावर 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचा गळा तिच्याच साडीने आवळून त्यानंतर डोक्यात जबरी वार करण्यात आल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेचा चेहरा केमिकल टाकून विद्रुप करण्यात आला आहे. त्यामुळे तिची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. दरम्यान, पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा (Crime News) दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरेगाव येथील एका शेताच्या बांधावर महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना मिळाली. तत्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पाहणी केली असता, अज्ञात आरोपीने या महिलेच्या डोक्यात जबरी वार केले होते. तसेच तिचा गळा आवळला होता. एवढेच नाही तर तिचा चेहरा ओळखू नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर कसले तरी केमिकल टाकून विद्रुप केल्याचे निदर्शनास आले. अत्यंत निर्घृणपणे महिलेची हत्या (Crime News) करण्यात आली होती. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह श्वान पथकाला पाचारण केले. घटनास्थळावरून काही पुरावे आढळून आले आहेत. त्याअनुषंगाने तपास सुरु आहे.

Web Title :- Crime News | murder of 30 years old woman in-shrigonda of ahmednagar district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deglur-Biloli By-Election | देवेंद्र फडणवीसांनी फोडला शिवसेनेचा नेता, ‘या’ मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा

Devendra Fadnavis | खा. कोल्हेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा टोला, म्हणाले – ‘कुणी स्वप्न पाहायला हरकत नाही’

Pune Crime | पुणे शहरात वाहन चोरी करणारे चारजण गुन्हे शाखेकडून गजाआड, रिक्षासह 6 दुचाकी जप्त