Crime News | खळबळजनक ! एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; 3 दिवसात एक-एक करीत सदस्यांनी सोडला प्राण

बिहार / मोतिहारी : वृत्तसंस्था Crime News | बिहार (Bihar) राज्यात काळीज पिळवटुन टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील चंपारणमधील एकाच कुटुंबातील 5 सदस्यांचा मृत्यु (Died) झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका निनावी आजारामुळे 3 दिवसात घरातील एक-एक करीत सर्वांचा बळी गेला आहे. ही धक्कादायक घटना मोतिहारीमधील मुफ्फसिल पोलीस ठाणे (Muffasil Police Station) हद्दीत घडली आहे. दरम्यान, सातत्याने मृत्यु होत असल्याने स्थानिकांनी आक्रोश (Crime News) व्यक्त केला आहे.

अधिक माहितीनुसार, मुफ्पसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात अचानक झालेल्या मृत्यूंमुळे परिसरात भयावह वातावरण निर्माण झालं आहे.
आज 2 मुलांचा मृत्यू झाला आहे. 3 दिवसात 5 आणि गेल्या सहा महिन्यात या कुटुंबातील 8 सदस्यांचा मृत्यू झालाय. असं डाॅक्टरांनी (Doctor) सांगितलं आहे.
तर, या कुटुंबाच्या घराच्या मागे भलमोठं झाड होतं. जे 6 महिन्यांपूर्वी पडलं होतं.
कुटुंबीयांनी त्यांना सांगितलं की, त्यानंतर या घरात मृत्यूच्या घटना सुरू झाल्या आहेत.

डॉक्टरांनी (Doctor) दिलेल्या माहितीनुसार, झाड पडल्यानंतर कुटुंबीय भुताचा परिणाम मानून तांत्रिकाकडे गेले आणि त्याच्याकडून उपचार करू लागले.
आज झालेल्या मृत्यू प्रकरणातील मृतदेहांच्या नाका-तोंडातून फेस येत होता आणि एका मृतदेहाच्या कानातून रक्त निघत होता.
जो सर्पदंश किंवा विष घेतल्यामुळे झाल्याची शक्यता आहे.
पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर याबाबत नेमकं काय झालंय ते कळणार आहे.

 

दरम्यान, महासाथीच्या तज्ज्ञांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास (Investigation) सुरू केलाय.
ते मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहे. मृत व्यक्तीचं कुटुंबीय सीता देवी आणि सरिता देवी यांनी सांगितलं की, पोटदुखीनंतर गळ्यात वेदनाच्या तक्रारी जाणवत होत्या, त्यानंतर काही वेळात त्यांचा मृत्यू झाला.
मृत प्रियांशच्या वडिलांनी सांगितलं की, गेल्या सहा महिन्यात 8 लोकांचा मृत्यू झाला.

 

Web Title : Crime News | sensation in the area due to the death of 5 members of the same family

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jayant Patil | राजू शेट्टी आमदार होणार की नाही?; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अन् मंत्री जयंत पाटील म्हणाले…

Aadhaar Card केंद्र चालक जास्त पैसे मागत आहे का? जाणून घ्या कुठं अन् कशी करावी तक्रार

Indian Railways, IRCTC | रेल्वेने प्रवाशांना दिली ‘ही’ मोठी सवलत, जाणून घ्या कोणती