Crime News | दुर्देवी ! स्वत:च्याच शेततळ्यात बुडून दोघा भावांचा मृत्यू; प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाईन – Crime News | चांदवड (Chandwad) तालुक्यातील पाटे गावामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेत शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Crime News) झाला आहे. या घटनेमुळे पाटे गावावर शोककळा पसरली आहे. पाटे येथील प्रगतशील शेतकरी संजय तळेकर (Sanjay Talekar) यांचा मोठा मुलगा ओम ( Om Talekar) व लहान मुलगा साईल (Sahil Talekar) हे सकाळी बारा वाजताच्या सुमारास शेत गट नंबर ७० लगत असलेल्या नाल्या जवळ बकऱ्या चारण्यासाठी गेले होते.

 

त्या ठिकाणी जवळच शेततळं होतं. पावसामुळे शेततळं काटोकाट भरलं होतं. त्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे तळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.शेततळे पूर्ण पाण्याने भरले असल्याने त्यांचा शोध घेण्यात वेळ लागला. जवळपास एक तासांनंतर नागरिकांच्या मदतीने या दोघां भावांना पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात (Chandwad Sub-District Hospital) दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्या दोघांना तपासून मृत घोषित केले.

 

 

यावेळी या दोघांच्या घरच्यांनी ओम अन साईलच्या नावाचा एकच टाहो
फोडल्याने संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर सुन्न झाला होता.
संजय तळेकर यांना ओम व साईल हे दोघेच मुले असल्याने त्यांचा असा
अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण पाटे गावातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Web Title :- Crime News | two brothers drown in own farm the unfortunate incident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा