पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारिरीक छळ करणाऱ्या पतीकडून वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.४) कोरेगाव पार्क येथील आतुर पार्क सोसायटीत घडली होती.

लिप्सा जितेंद्र जितेंद्र साहा (वय -३० रा.आतुर पार्क सोसायटी, कोरेगाव पार्क) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती जितेंद्र मुकेश साहा (वय-३५) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लिप्सा हिचे वडील चंद्रभानु दास (वय-५९ रा. भुवनेश्वर राज्य ओडिसा) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

[amazon_link asins=’B0174KJV4O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d2e31dde-996b-11e8-83ac-ab6e3152a3d3′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिप्सा आणि जितेंद्र यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही कोरेगाव पार्क येथील आतुर पार्क सोसायटीत राहत होते. दरम्यान, पती जितेंद्र याने पत्नी लिप्सा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच तीला जीवे मारण्याची धमकी दिली. पतीकडून होत असलेल्या वारंवार त्रासाला कंटाळून लिप्सा हिने शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येस तिचा पती जितेंद्र साहा हा जबाबदार असून त्यानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्य़ाद लिप्साच्या वडीलांनी दिली. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अरुण गौड करीत आहेत.