Crisis Of Load Shedding in Maharashtra | …म्हणून महाराष्ट्रात 48 तासांनंतर लोडशेडिंगचे मोठे संकट ?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Crisis Of Load Shedding in Maharashtra | राज्यातील सरकारी वीज कंपन्यामध्ये (Electricity Company) कार्यरत असणारे अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांनी एकीकडे संपाचं पाऊल उचललं असतानाच दुसरीकडे 48 तासानंतर महाराष्ट्रावर लोडशेडिंगचे मोठे संकट येणार असल्याचे समजते. कारण कोल इंडियाच्या युनियन (Union of Coal India) 2 दिवसांच्या संपावर गेल्याने कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प असणार आहे. म्हणून लोडशेडिंग करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Big load shedding crisis in Maharashtra after 48 hours?)

 

महाराष्ट्रातील सरकारी वीज कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी व कामगार 2 दिवसीय अर्थात 28 आणि 29 मार्च रोजी संपावर गेल्याने राज्यातील विविध ठिकाणी या संपाचा फटका बसणार असल्याचं समजते.
त्याचबरोबर कोल इंडियाच्या युनियन दोन दिवसांच्या संपावर गेल्याने 2 दिवस कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे.
दरम्यान पारस (Paras), नाशिक (Nashik) व भुसावळ (Bhusawal) येथील वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर, कोराडी (Koradi), खापरखेडा (Khaparkheda) व चंद्रपूरचे (Chandrapur) वीज निर्मिती संचही प्रभावित होणार आहे.
याचा परिणाम म्हणजे राज्यात 48 तासानंतर लोडशेडिंगची दाट शक्यता आहे.

दरम्यान, महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या शासनाच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी – कर्मचारी यांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा असून या अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम अर्थात मेस्मा (Marashtra Essential Services Maintenance Act)
लागू करून त्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे राज्य सरकारकडून (Maharashtra Government)
प्रसिद्ध आदेशात आज सांगण्यात आले.
तर, केंद्र सरकारच्या (Central Government) वीज क्षेत्राच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांनाही राज्याच्या ऊर्जा विभागाने,
राज्य सरकारने तीव्र विरोध केला आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी यापूर्वीच राज्यातील वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- Crisis Of Load Shedding in Maharashtra | big crisis of load shedding in the state after 48 hours in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा