हुमणी किडीमुळे शेतकर्‍यांचे करोडो रूपयांचे नुकसान : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : पाेलीसनामा ऑनलाईन

देवा राखुंडे / सुधाकर बोराटे

हुमणी किडीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या उस पिकाचे करोडो रूपयांचे नुकसाण झाले आहे. तरी राज्याच्या कृषि खात्याने यावर त्वरीत उपाय योजना करून ही लागलेली कीड नष्ट करावी अशी मागणी राज्याचे माजी सहकार मंत्री तथा कर्मयोगी सह. साखर कारखाण्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’209e6760-b762-11e8-940e-699182cc5c26′]

पाटील यांनी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता राजेवाडी येथिल शेतकरी हिराजी केरू मोरे या शेतकर्‍याच्या पाऊण एकर उसाला लागलेल्या हुमणीची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते.पाटील पुढे म्हणाले कर्मयोगी साखर कारखाण्याच्या वतीने कृषि तज्ञांना बोलावुन शेतकर्‍यांच्या कार्यशाळा घेत आहोत. या किडीवर काय उपाय योजना करावयाची, कोणते औषध मारावयाचे या बद्दलची माहीती शेतकर्‍यांना देत आहोत.

न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून बदनामीचा प्रयत्न – धनंजय मुंडे

राज्याचे कृषि खाते व कृषि विद्यापिठाचे अधिकारी अद्याप पर्यंत इंदापूर तालुक्यात फिरकलेले नाहीत.
राज्याचे कृषिखाते झोपले आहे काय ? असा सवाल पाटील यांनी केला.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a9fe53c-b762-11e8-8a67-7b6cedc76e6f’]

या वर्षी जर हुमणी आटोक्यात आली नाही तर पुढील वर्षी उसाचे तीस टक्केच उत्पादन निघेल.अशी भिती पाटील यांनी या वेळी व्यक्त केली.त्यामुळे साखर कारखाने चालनार नाहीत व शेतकर्‍यांचे करोडो रूपयांचे नुकसान होणार आहे.पाटील पुढे म्हणाले या वर्षी इंदापूर तालुक्याकडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने उसाला हुमणी लागली आहे.ती कीड उसाचे संपूर्ण पिक नष्ट करते. सात आठ फुट उंचीचा उस देखिल वाळुन जाउन खाली पडत आहे.त्यामुळे शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागणार नाही.उस पिकासाठी घेतलेले कर्ज परत कसे फेडायचे असे आनेक प्रश्न शेतकर्‍यांपुढे आ वासुन उभे राहणार आहेत. उस पाहणिच्या वेळी पाटील यांचेबरोबर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव,कारखाण्याचे संचालक भरत शहा, अंकुश काळे, हणुमंत जाधव,प्रगतशिल शेतकरी महेंद्र रेडके, नारायण वीर, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, कार्यालयीन अधिक्षक शरद काळे, शेतकी अधिकारी शिंदे, व अनेक शेतकरी उपस्थित होते.